नवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार?

सानपाडा परिसरातील जॅक अँड जिल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रेम पहूजा यांनी बुधवारी (22 सप्टेंबर) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. घरातील गॅलरीच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

नवी मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टराची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मृत्यूचं गूढ कसं उलगडणार?
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई : सानपाडा परिसरातील जॅक अँड जिल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रेम पहूजा यांनी बुधवारी (22 सप्टेंबर) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. घरातील गॅलरीच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पत्नी कल्याण येथे राहत असल्याने डॉक्टर सानपाड्यात एकटेच राहत होते. रुग्णालयात दुपारी 1 वाजता रुग्ण आला असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर प्रेम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, प्रेम हे रुग्णालयाच्या इमारतीतच राहायला असल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या वॉचमनला घरी पाठवेल. यावेळी डॉक्टरांनी परिचारिकेशी बोलून रुग्ण हाताळला आणि संध्याकाळी ओपीडीला येतो, असे सांगितले.

सोसायटीच्या सदस्यांनी दरवाजा तोडला

डॉक्टर संध्याकाळी 7 वाजता ओपीडीला आले नसल्याने रुग्णालयातून त्यांना फोन केल्यावर त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे पुन्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने वॉचमेनसोबत घरी जाऊन त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. याबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या सदस्यांनाही कल्पना दिली. त्यानंतर सोसायटी सदस्यांनी पोलिसांना कळवून दरवाजा तोडला. यावेळी डॉक्टर गॅलरीमधील पत्र्याच्या अँगेलाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.

घटनास्थळी सुसाईड नोट नाही, आत्महत्येचं गूढ वाढलं

डॉक्टर प्रेम पहूजा हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व असलेले नवी मुंबई परिसरात प्रचलित डॉक्टर होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे मृत्यचे गूढ वाढले आहे. सानपाडा पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात महिलेची आत्महत्या

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुण्यात एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली हे अजूनतरी समजू शकलेले नाही. मात्र, अचानकपणे समोर आलेल्या या घटनेमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

मृतदेहाशेजारी आढळली रक्ताने माखलेली डायरी

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलेच्या घराची पाहणी केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत महिलेच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली एक डायरी आढळून आली आहे. रक्ताने माखलेली डायरी मिळाल्यामुळे महिलेच्या आत्महत्येचं गूढ आणखीनच  वाढलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या डायरीला पंच आणि नातेवाईकांच्या समोर उघडण्यात येणार आहे.

हेही वाचा :

महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येनंतर अयोध्येत आणखी एका साधूचा संशयास्पद मृत्यू, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

एकत्र दारु प्यायले, जंगी पार्टी केली, गाण्याचा गायक कोण यावरुन वाद, नागपुरात मित्राकडूनच मित्राची चाकूने भोसकून हत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI