CCTV : विरार रेल्वेस्थानकात दहशत! प्रवाशाला बेदम मारहाण, गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल लुटला

विजय गायकवाड

विजय गायकवाड | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: May 19, 2022 | 12:42 PM

Virar Station CCTV Video News : क चोरटा प्रवाशाच्या गळ्यातली चैन आणि मोबाईल लुटण्याच्या इराद्यानं त्याला मारहाण करतोय. पण प्रवाशाकडून त्याला विरोध झाला.

CCTV : विरार रेल्वेस्थानकात दहशत! प्रवाशाला बेदम मारहाण, गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल लुटला
थरारक घटना

विरार : विरार रेल्वे (Virar Railway Station CCTV) स्थानकातून धक्कादायक घटना समोर आली. 15 मे रोजी मध्यरात्री एका प्रवाशाला विरार रेल्वे (Virar station News) स्थानकात लुटण्यात आलं. या प्रवाशाला तुफान मारहाण करण्यात आली. प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि त्याचा मोबाईल चौघांनी लुटला. विरार (Virar Crime News) रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेनं रात्रीच्या वेळेस रेल्वे स्थानकातून जाणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या सरकत्या जिन्यांवर चढताना प्रवाशाला आधी बेदम मारहाण केली गेली. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल फोन घेऊन चोरटे फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  यावेळी प्रवाशात आणि चोरी करणाऱ्यांमध्ये मोठी झटापट झाली. या मारहाणीत प्रवासी रक्तबंबाळ झाला होता. भर रेल्वे स्थानकात ही घटना घडल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

पाहा व्हिडीओ :

नेमकं काय घडलं?

विरार रेल्वे स्थानकात एक पुरुष प्रवासी सरकत्या जिन्यावर चढत होता. या जिन्याच्या वरच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री अडीच वाजता घडलेली घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या व्हिडीओमध्ये काही चोरटे आधीच वर उभे असल्याचं दिसतंय. तर जिन्याच्या खालच्या बाजूला काही दोघांमध्ये झटापट झालीय. एक चोरटा प्रवाशाच्या गळ्यातली चैन आणि मोबाईल लुटण्याच्या इराद्यानं त्याला मारहाण करतोय. पण प्रवाशाकडून त्याला विरोध झाला. या दरम्यान दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटापटीने जिन्यावर उभे असणाऱ्या दोघे अस्वस्थ झाल्याचंही दिसतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by tv9 marathi (@tv9marathilive)

अखेरीच एक चोरटा सरकत्या जिन्यावरुन फरफटक प्रवाशाला वर आणतो. प्रवासीही या चोरट्याला सोडत नाही. त्याच्या पायाला धरुन ठेवतो. पण इतर तिघे चोरटे या प्रवाशावर हल्ला करतात आणि त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवतात.

या मारहाणीत प्रवाशाची ताकद कमी पडते. अखेर सोन्याची चैन आणि मोबाईल प्रवाशाला या मारहाणी गमवावा लागलाय. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विरार स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. विरार रेल्वे स्थानकात आता या घटनेनंतर भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी विरार रेल्वे स्थानाकातून प्रवास करणं सुरक्षित नसल्याचं या घटनेनं अधोरेखित केलंय.

हे सुद्धा वाचा

वसई लोहमार्ग पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतलाय. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI