AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SACHIN VAZE : सचिन वाझेची उलटतपासणी, अनिल देशमुखांबद्दल वाझे म्हणाला…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सचिव संजीव पलांडे यांच्या वकिलाकडून सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आलीय. त्यात वाझेने देशमुखांच्या सांगण्यावरूनच पोलीस खात्यात पुन्हा येण्यासाठी वाझेने अर्ज केल्याचं म्हटलंय, मात्र पुरावे नसल्याचंही जबाबात वाझेनं म्हटलंय.

SACHIN VAZE : सचिन वाझेची उलटतपासणी, अनिल देशमुखांबद्दल वाझे म्हणाला...
सचिन वाझे आणि अनिल देशमुख
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 24, 2021 | 4:23 PM
Share

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सचिव संजीव पलांडे यांच्या वकिलाकडून सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आलीय. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सचिव संजीव पलांडे यांच्या वकिलाकडून सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आलीय. त्यात वाझेने देशमुखांच्या सांगण्यावरूनच पोलीस खात्यात पुन्हा येण्यासाठी वाझेने अर्ज केल्याचं म्हटलंय, मात्र पुरावे नसल्याचंही जबाबात वाझेनं म्हटलंय.

वाझेकडे कोणतं रिक्वेस्ट लेटर?

देशमुखांच्या सांगण्यावरून आल्याचा कुठलाही पुरावा नसला तरी माझ्याकडे रिक्वेस्ट लेटर असल्याचं जबाबात म्हटलंय. सचिन वाझेने चांदीवली कमिशनच्या चौकशीत ही माहिती उलटतपासादरम्यान दिलीय.

माजी गृहमंत्र्यांना अटक, परमबीर सिंह फरार

परमबीर सिंह यांच्याकडून आरोप झाल्यानंतर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक झाल्याचंही पहायला मिळालं. तर तत्कालीन पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप झाले, त्यानंतर परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आलं. याच प्रकरणावरून भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. वाझे सरकारमधील मंत्र्यांचा वसूली एजंट असल्याचे आरोप झाले. त्यानंतर याप्रकरणात सीबीआय आणि ईडीचीही एन्ट्री झाल्याचं पहायला मिळालं. ईडी आणि सीबीआयकडून अनिल देशमुखांच्या घरावर धाडसत्र करण्यात आलं.

महाराष्ट्राला हादरवून सोडणारे प्रकरण

आधी मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी आणि नंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे सध्या अटकेत आहे. वाझेच्या अटकेनंतर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत राजकारण तापल्याचं पहायला मिळालं. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुखांचं गृहमंत्रिपद गेलं. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी किती जणांच्या अडचणी वाढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News LIVE Update | शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार

SHARAD PAWAR : साताऱ्यातलं डॅमेज कंट्रोल रोखण्यावर शरद पवारांचे कार्यकर्त्यांना कानमंत्र

Follow Us
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?