SHARAD PAWAR : साताऱ्यातलं डॅमेज कंट्रोल रोखण्यावर शरद पवारांचे कार्यकर्त्यांना कानमंत्र

साताऱ्यातल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा अगदी एका मताने पराभव झाल्यानंतर त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदेंनी निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती असं वक्तव्य पवारांनी केलंय.

SHARAD PAWAR : साताऱ्यातलं डॅमेज कंट्रोल रोखण्यावर शरद पवारांचे कार्यकर्त्यांना कानमंत्र
sharad pawar
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 2:33 PM

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतल्या राष्ट्रवादीच्या डॅमेजवरून शरद पवारांनी युवा कार्यकरत्यांना कानमंत्र दिेलेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाल्यानंतर त्यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. शशिकांत शिंदे यांनी निवडणूक हवी तेवढी गांभीर्यानं घेतली नाही, त्यांनी निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडी एकत्र लढली नाही

महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढली नाही असंही पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. राज्यात पुढे पालिकेच्या, नगरपरिषदांच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना याबाबत जागृत करणे गरजेचं आहे असं वक्तव्य पवारांनी केलंय.

सांगलीतल्या निकालांचं पवारांकडून कौतुक

सांगलीतील निकाल चांगले लागले म्हणत शरद पवारांनी सांगलीतील जिल्हा बँकेच्या निकालांचं कौतुक केलंय. महाबळेश्वरमध्ये युवा राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर भरवण्यात आलं होतं. त्या शिबिराचा समारोप शरद पवार आणि गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. याशिबिरात शरद पवार युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसून आले.

पुन्हा एकदा दुफळी समोर

या पराभवाने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील दुफळी समोर आली आहे. शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्याच कार्यलयावर दडफेक करताना दिसून आले. तर राज्यात सरकारमध्ये एकत्र असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही नाराजीचे सूर दिसून आले. त्यामुळे साताऱ्यातलं डॅमेज कंट्रोल शरद पवार आगामी काळात कसं करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचं आणि अंतर्गत वाद टाळण्याचं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

ऐतिहासिक वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूर

Maharashtra MLC Election 2021 : विधान परिषदेची रणधुमाळी, कोल्हापुरात पाटील- महाडिक गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.