मुंबई : मनोरंजन विश्वासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय दुःखद होता. अंधेरी एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका कलाकाराने अतिशय धक्कादायकरित्या या जगाचा निरोप घेतला आहे. बॉलीवूड किंग सलमान खानचा बॉडी डबल (Salman Khan Body Double) सागर पांडेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Death by heart attack) झाल्याची घटना घडली आहे. जिममध्ये वर्कआऊट (Workout in Gym) करत असतानाच सागरचे दुःखद निधन झाले.