VIDEO : भल्या पहाटे रिक्षातून आले, दुकानाचं शटर फोडलं, रोख पैसे, दारुच्या बाटल्या चोरल्या, सीसीटीव्हीत घटना जशीच्या तशी

निनाद करमरकर

| Edited By: |

Updated on: Sep 20, 2021 | 2:58 PM

पहाटे साडेतीन ते चार वाजेची झोप ही आपण साखर झोप म्हणतो. संपूर्ण शहर यावेळी गाढ झोपेत असतं. शहरात शांतता आणि अंधार असतो. याच शांततेचा फायदा घेऊन काही चोरटे त्यांचं हित साधून घेतात.

VIDEO : भल्या पहाटे रिक्षातून आले, दुकानाचं शटर फोडलं, रोख पैसे, दारुच्या बाटल्या चोरल्या, सीसीटीव्हीत घटना जशीच्या तशी
भल्या पहाटे रिक्षातून आले, दुकानाचं शटर फोडलं, रोख पैसे, दारुच्या बाटल्या चोरल्या, सीसीटीव्हीत घटना जशीच्या तशी
Follow us

उल्हासनगर (ठाणे) : पहाटे साडेतीन ते चार वाजेची झोप ही आपण साखर झोप म्हणतो. संपूर्ण शहर यावेळी गाढ झोपेत असतं. शहरात शांतता आणि अंधार असतो. याच शांततेचा फायदा घेऊन काही चोरटे त्यांचं हित साधून घेतात. कधी घरफोड्या करतात, तर कधी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडतात. या अशा घटना वारंवार घडत असतात. रात्रीच्यावेळी पोलीस गस्तीवर असतातच. पण सर्वच ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही. त्यामुळे काही चोरटे धाडसी चोरी करुन मोठमोठा मुद्देमाल चोरी करतात. उल्हासनगर शहरात अशीच काहिशी घटना समोर आली आहे.

चोरटे पैसे आणि दारुच्या बाटल्या घेऊन पसार

उल्हासनगरच्या कॅम्प एक परिसरातील खेमाणी भागात विकी वाईन्स हे दारुचं दुकान आहे. रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास या दुकानात दोन अज्ञात चोरटे घुसले, तर त्यांचा एक साथीदार रिक्षा घेऊन दुकानाच्या बाहेर उभा राहिला. शटर वाकवून या चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ल्यातून 25 हजार रुपयांची रोख रक्कम त्यांनी चोरून नेली.

चोरटे जाता जाता महागड्या मद्याच्या चार बाटल्याही घेऊन गेले. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्हीत घटना कैद

उल्हासनगरात सोनसाखळी चोराने महिलेला फरपटत नेलं

उल्हासनगरात वाईन शॉपमधील चोरीची घटना ताजी असताना सोनसाखळी चोरीची आणखी एक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये एका सोनसाखळी चोराने महिलेला फरपटत नेल्याची घटना घडली आहे. आज सकाळी उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे उल्हासनगरात नुकत्याच दोन हत्येच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय.

नेमकं काय घडलं?

धोबीघाट परिसरात जोधपूर मिठाईवाला हे दुकान आहे. या दुकानातून मोर्या टीचर नामक महिला आज सकाळी काही सामान घेऊन बाहेर पडली. यावेळी एक चोरटा दुचाकीवरुन तिथे आला आणि दुचाकी सुरू ठेवून तो चालत मोर्या टीचर यांच्याजवळ आला. त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा त्याने केला आणि निघताना त्यांच्या गळ्यातली सोनसाखळी ओढत तो गाडीकडे पळाला. मात्र मोर्या टीचर यांनी त्याच्या मागे पळत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याने त्यांना फरपटत नेलं, मात्र अखेर चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात वारंवार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असून पोलीस या चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरतायत.

संबंधित बातम्या :

Video | लसीकरणाचा पुरावा मागितल्याचा राग, हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्याला तिघी जणींची मारहाण

पुण्यात 1.2 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, लहान मुलासह आलेल्या दोन महिलांकडून चोरी

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI