सोसायटीचे गेट उघडायला उशीर झाल्याने तरुणाकडून बुलेटच्या चैनने वॉचमनला अमानुषपणे मारहाण

सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर झाला या कारणावरुन एका तरुणाने वॉचमनला बुलेटच्या चैनने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे (Watchman brutally beaten by youth in Kalyan)

सोसायटीचे गेट उघडायला उशीर झाल्याने तरुणाकडून बुलेटच्या चैनने वॉचमनला अमानुषपणे मारहाण

कल्याण (ठाणे) : सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर झाला या कारणावरुन एका तरुणाने वॉचमनला बुलेटच्या चैनने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी स्टॅली जॉर्ज नावाच्या या तरुणावर कारवाई केली आहे. मात्र, आरोपीने अशाप्रकारे निर्दयी वागणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली आहे. तसेच सोसायटीतील नागरिकांची देखील तशीच भावना आहे. आरोपी विरोधात पोलिसांनी कारवाई केल्याने यापुढे तो अशा प्रकारे वागणार नाही, अशी आशा सोसायटीतील काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे (Watchman brutally beaten by youth in Kalyan).

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात एक धक्कादायक  प्रकार समोर आला आहे. रंजना अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्या स्टॅलीन जॉर्ज नावाचा एक तरुण सोसायटीचा वॉचमनला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रंजना अपार्टमेंटमध्ये मुकेश थापा हा वॉचमनचे काम करतो (Watchman brutally beaten by youth in Kalyan).

दोन दिवसांपूर्वी स्टॅलीन जॉर्ज सोसायटीत आला असता. मुकेश हा काही कामात व्यस्त असल्याने त्याने गेट उशिराने उघडले. स्टॅलीन जॉजर्ने वॉचमन मुकेशला शिवीगाळ केली. त्यानंतर तो घरी निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी इमारतीखाली येऊन त्याने बुलेटच्या चैनने मुकेश याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे.

स्टॅलीन विरोधात कारवाई

मुकेशला वाचविण्यासाठी एक व्यक्ती पुढे आली. तरीपण स्टॅलीन काही ऐकायला तयार होता नव्हता. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी प्रतिक्रिया दिली. स्टॅलीन जॉर्ज विरोधात कायदेशीर करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे अमानुषतेचा प्रकार समोर आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : VIDEO : अबब ! 500-2000 च्या नोटांचा खच, कुख्यात गुंडाच्या घरात दोन नंबरचा पैसा? व्हिडीओ व्हायरल