प्रेम एकीवर केलं, लग्न दुसरीसोबतच, पहिलीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं, आता जगण्यासाठी संघर्ष

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 28, 2021 | 5:25 PM

मुंबईत एका 26 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या कुटुंबियांविरोधात बंड पुकारलं. कारण प्रियकराच्या कुटुंबियांनी दुसऱ्या मुलीसोबत त्याचा साखरपुडा केला. याच गोष्टीचा राग मनात घेऊन तरुणीने प्रियकराच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रेम एकीवर केलं, लग्न दुसरीसोबतच, पहिलीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं, आता जगण्यासाठी संघर्ष
प्रेमासाठी मुंबईच्या तरुणीचा एल्गार, दुसऱ्या मुलीशी साखरपुडा झालेल्या प्रियकरासाठी बंड, घरासमोर अंगावर रॉकेल ओतलं, 50 टक्के भाजली

मुंबई : मुंबईत एका 26 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या कुटुंबियांविरोधात बंड पुकारलं. कारण प्रियकराच्या कुटुंबियांनी दुसऱ्या मुलीसोबत त्याचा साखरपुडा केला. याच गोष्टीचा राग मनात घेऊन तरुणीने प्रियकराच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रचंड आरडाओरड केली. प्रियकराच्या आई आणि बहिणीसोबत वाद घातला. त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात घडली आहे. 26 वर्षीय तरुणीचं आग्रीपाड्यात वास्तव्यास असलेल्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण दोघांच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हतं. कारण दोघं हे नात्याने भाऊ-बहीण लागत होते, असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. पण तरुणी आपल्या हट्टाला पेटली होती. तिला त्याच मुलासोबत लग्न करायचं होतं. दुसरीकडे तिच्या प्रियकराच्या कुटुंबियांनी त्याच्यासोबत लग्नासाठी दुसरी मुलगी बघितली होती. तसेच त्यांनी मुलाचा साखरपुडाही उरकला होता.

तरुणीचा प्रियकराच्या घराबाहेर एल्गार

प्रियकराच्या साखरपुड्याची माहिती मिळाल्यानंतर तरुणीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती खार परिसरात वास्तव्यास होती. त्यामुळे प्रियकराच्या साखरपुड्याची माहिती तिला थोडी उशिराने माहिती पडली. या घटनेनंतर मुलगी आज (28 ऑगस्ट) थेट आग्रीपाडा येथे प्रियकराच्या घरासमोर दाखल झाली. तिथे तिने प्रियकराच्या कुटुंबियांविरोधात आरडाओरड सुरु केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तरुणाची आई आणि बहीण बाहेर आले. यावेळी तरुणी आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.

तरुणीने स्वत:ला पेटवून घेतलं

थोड्या वेळाने तरुणाची आई आणि बहीण घरातून बाहेर पडले. त्यानंतर तरुणी घरात शिरली. तिथे तिला एक रॉकेलचा कॅन सापडला. तिने ते रॉकेल थेट अंगावर टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. यावेळी तिने प्रचंड आरडाओरड केली. तरुणीला रस्त्यावर पेटताना बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. काही जणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझली. त्यानंतर तरुणीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत तरुणी 50 टक्के भाजली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

हेही वाचा :

छेडछाड करत भर रस्त्यात तरुणीचे कपडे फाडले, औरंगाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रक्षाबंधननिमित्ताने मुलीसोबत जावई गावी आला, पण कुणीतरी त्याची हत्या केली, गावात एकच खळबळ

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI