AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

तरुणाचा मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तरुणाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेने माहिम परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

माहिममध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
आर्थिक चणचणीतून विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: Google
| Updated on: Dec 03, 2022 | 8:19 PM
Share

मुंबई : माहिम परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. माहिम पोलिसांना 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरुणावर नेमका हल्ला कोणी केला आहे हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. तरुणाचा मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तरुणाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेने माहिम परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

माहीम परिसरात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या जखमी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

धारदार शस्त्राच्या हल्ल्यामुळे तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आकाश संजय भालेराव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे, अशी माहिती माहिम पोलिसांनी दिली आहे.

नेमके कारण अद्याप उघड नाही

तरुणावर हल्ला कोणी केला तसेच हल्ला करण्यामागील नेमके कारण काय असू शकेल, याचे धागेदोरे पोलिसांकडून शोधले जात आहे. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

लाज वाटली पाहिजे....लाखो रुपये खातात अन्... भाजपवर ठकारेंचा हल्लाबोल
लाज वाटली पाहिजे....लाखो रुपये खातात अन्... भाजपवर ठकारेंचा हल्लाबोल.
रश्मी शुक्ला वर्दीतल्या कार्यकर्ता, राऊतांच्या टीकेवर भाजपचा पलटवार
रश्मी शुक्ला वर्दीतल्या कार्यकर्ता, राऊतांच्या टीकेवर भाजपचा पलटवार.
आम्ही एकत्र आल्यास मिरची का लागते? उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल
आम्ही एकत्र आल्यास मिरची का लागते? उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल.
राज अन् उद्धव ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर पहिल्यांदाच तोफ धडाडणार
राज अन् उद्धव ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर पहिल्यांदाच तोफ धडाडणार.
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मुलगा वाटत नाही, नितेश राणेंची जहरी टीका
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मुलगा वाटत नाही, नितेश राणेंची जहरी टीका.
काँग्रेसचं मटण खाऊन कमळाचं बटण दाबा म्हणताय... वडेट्टीवारांचा निशाणा
काँग्रेसचं मटण खाऊन कमळाचं बटण दाबा म्हणताय... वडेट्टीवारांचा निशाणा.
कल्याणमध्ये रिक्षाचालकांचीच फ्री स्टाईल हाणामारी, बघा व्हिडीओ
कल्याणमध्ये रिक्षाचालकांचीच फ्री स्टाईल हाणामारी, बघा व्हिडीओ.
परळीत दादा-शिंदेंच्या गटात एमआयएम, एकनाथ शिंदे म्हणताय कोण MIM?
परळीत दादा-शिंदेंच्या गटात एमआयएम, एकनाथ शिंदे म्हणताय कोण MIM?.
महाराष्ट्रात काय सुरू आहे? बदलापूर प्रकरणावर राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
महाराष्ट्रात काय सुरू आहे? बदलापूर प्रकरणावर राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.
ठाकरे बंधू vs भाजप, मराठीवरुन अदानींच्या दिशेन BMC महापालिकेचा प्रचार
ठाकरे बंधू vs भाजप, मराठीवरुन अदानींच्या दिशेन BMC महापालिकेचा प्रचार.