AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक

पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश आणि त्रासदायक कॉल पाठवण्याच्या आरोपाखाली अमोल काळे याला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई झाली. काळे हा पुण्यात रहात असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे.

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक
पंकजा मुंडेImage Credit source: social media
| Updated on: May 02, 2025 | 10:21 AM
Share

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवणे आणि त्रासदायक कॉल करणे या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमोल काळे (वय 25) असे आरोपीचे नाव असून अश्लील फोन कॉल करणे आणि अनुचित संदेश पाठवणे या आरोपाखाली सायबर पोलिसांनी काळे याला अटक केली.

नोडल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निखिल भामरे (26) यांनी तक्रार दाखल केली होती. भामरे हे मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात. आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह एफआयआर नोंदवला.

असा लावला आरोपीचा शोध

आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता, तो ट्रेस करत पोलिसांनी संशयिताचे स्थान अर्थात लोकेशन शोधून काढलं. ते पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोल काळे (25) या आरोपीला ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काळे याने आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचे कबूल केले. त्यानंतर, अमोल काळे याला बीएनएनएस कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली, मुंबईत आणण्यात आले आणि औपचारिकरित्या अटक करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी आहे . त्याने अश्लील भाषा का वापरली, तसेच छळ करण्याच्या वर्तनामागील त्याचा हेतू काय याचा तपास सध्या करण्यात येत आहे, असे नोडल सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याला जरी पुण्यातील भोसरी येथे अटक करण्यात आली असली तरी काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील असे समजते. पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.