AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी अडचणीत, बोगस डिग्री घेऊन क्लिनिक चालवल्याचा आरोप

प्रसिद्ध अभिनेत्याच्या डॉक्टर पत्नीची डिग्री बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनेक सेलिब्रिटी तिच्याकडे उपचार घेतात. तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime : प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी अडचणीत, बोगस डिग्री घेऊन क्लिनिक चालवल्याचा आरोप
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 20, 2023 | 11:15 AM
Share

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अमित टंडन (actor Amit Tandon) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमित टंडन याची पत्नी आणि डर्मॅटॉलॉजिस्ट रुबी टंडन ( Ruby Tandon) हिच्या अडचणी वाढल्या आहेत. रुबी टंडन ही प्रसिद्ध सेलिब्रिटी डॉक्टर आहे. मात्र ती बोगस डिग्री वापरत क्लिनिक चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केलेल्या पडताळणीत तिची डिग्री बनावट असल्याचे आढळल्यानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बनावट पदवी प्रमाणपत्राचा वापर केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या(एफआयआर) संदर्भात वांद्रे पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी याप्रकरणी प्रसिद्ध डर्मॅटॉलॉजिस्ट डॉ. रुबी टंडन हिला समन्स बजावले आहे. वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवर रुबी हिचे शिफा वेलनेस क्लिनिक आहे. अनेक सेलिब्रिटी हे तिचे ग्राहक असल्याचेही समोर आले.

पोलिसांनी केली कारवाई

डॉ. रुबी टंडन हिची पदवी अथवा डिग्री ही बनावट असून त्याची चौकशी करण्याची गरज असल्याची लेखी तक्रार एका अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे वांद्रे पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी हे पत्र खारमधील एच/वेस्ट वॉर्डमधील बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चव्हाण यांना पाठवले. त्यानंतर डॉ.चव्हाण आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलशी संपर्क साधला.

नोंदणीच झाली नाही

पोलिसांनी बीएमसीच्या एच वेस्ट विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्याला ही माहिती दिली. मुंबईतील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये डॉ. रुबी टंडन यांची नोंदणी नसल्याचे बीएमसीच्या तपासादरम्यान आढळून आले. त्यानंतर वांद्रे पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप केरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि बीएमसीच्या संयुक्त पथकाने क्लिनिकमध्ये जाऊन डॉ. टंडन आणि त्यांच्या पतीची चौकशी केली.

तेथे पदवी प्रमाणपत्र दाखवण्यास सांगितले असता, डॉ. रुबी टंडन यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नोंदणी प्रमाणपत्राची कलर प्रिंटआउट आणि मेडिकल कौन्सिलचा परवाना सादर केला. मात्र या प्रमाणपत्रांवर डॉ रुपिंदर धालीवाल आणि रुपिंदर टंडन जगत धालीवाल अशी नावे होती. प्रमाणापत्रावर असलेल्या वेगवेगळ्या नावांची पोलिसांनी चौकशी केली असता , लग्नापूर्वी आपले आडनाव धालीवाल होते, असे रुबी टंडन यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर ही सर्टिफिकेट्स जारी करणार्‍या संस्थेच्या वेबसाइटवर प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांना जुळणारी कोणतीही नोंद आढळली नाही. त्यानंतर डॉ.चव्हाण यांनी वांद्रे पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.