AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : कपड्यांमध्ये लपवून आणलं किलोभर सोनं, परदेशी महिलेचा गुन्हा असा उघडकीस आला

तस्करीची एक घटना समोर आली आहे. एका महत्त्वपूर्ण कारवाईत, मुंबई एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने मुंबई विमानतळावर एका परदेशी महिलेला सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना पकडले. तिच्याकडून ३ किलोंहून अधिक, कोट्यवधी रुपयांचं सोनं ताब्यात घेण्यात आलं.

Mumbai Crime : कपड्यांमध्ये लपवून आणलं किलोभर सोनं, परदेशी महिलेचा गुन्हा असा उघडकीस आला
| Updated on: Oct 02, 2023 | 3:28 PM
Share

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर (gold smuggling) हे विविध क्लुप्त्या लढवत असतात. काही दिवसांपूर्वीच नागपूर विमानतळावर एका इसमाने कॉफी मेकरमध्ये सोनं लपवलं होतं तर त्याआधी बाहेरच्या देशातून आलेल्या एका जोडप्याने चक्क बाळाच्या डायपरमध्ये सोनं लपवलं होतं. तस्करीचा असाच एक प्रकार आता समोर आला आहे. एका महत्त्वपूर्ण कारवाईत, मुंबई एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने मुंबई विमानतळावर एका परदेशी महिलेला सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना पकडले.

सहारा मोहम्मद उमर नावाच्या परदेशी महिलेकडून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच सोनं ताब्यात घेतलं. अंगावर सोन्याचे दागिने घालून तसेच तिने तिच्या कपड्यांमध्येही सोन्याचे दागिने लपवून आणल्याचे तपासणीमध्ये समोर आले होते.

उमर ही मुंबई विमानतळावर आल्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तिच्या हालचालीवरून संशय जाणवला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर, अधिकाऱ्यांनी तिला रोखून बाजूला थांबवले. तिची तपासणी करण्यात आली असता ती सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले. तिच्याकडून एकून 1.63 कोटी रुपयांचे सोने ताब्यात घेण्यात आले.

रिपोर्ट्सनुसार या महिलेने तिच्या कपड्यांमध्ये अनेक छोट्या-छोट्या कप्प्यांमध्ये लपवून सोनं आणलं होत. तिच्याकडे एकूण 3,464 ग्रॅम सोनं सापडलं. आंतराराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे 1.63 कोटी इतकी आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.

नागपूरमध्ये कॉफी मेकरमध्ये लपवून आणलं सोनं

यापूर्वी नागपूरमध्येही तस्करीचा असाच प्रकार उघडकीस आला होता. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका इसमाच्या हालचाली संशयास्पद होत्या. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने अधिकाऱ्यांनी त्याला थांबवलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्यांना त्यामध्ये कॉफी मेकर मशिन सापडलं. आणि त्याच्या आत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचं सोनं होतं. अखेर त्या इसमाला अटक करण्यात आली. सीमाशुल्क विभागाने सोने (gold) तस्करीच्या एका धक्कादायक प्रकरणाचा भांडाफोड करत दोन कोटी रुपयांचे सोने जप्त केले. मोहम्मद अहमद नावाच्या आरोपीने कॉफी मेकर मशिनमध्ये प्रत्येकी १७४८ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गोळे ( एकूण वजन 3 किलो 497 ग्राम सोने ) लपवून आणले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.