AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : तुमचे तुटलेले दातही कोठडीत पोहोचवू शकतात… चोरी करून पळाला; चार महिन्यांनी कसा सापडला ?

चोरी झालेल्या ठिकाणाहून पोलिसांना दोन दात सापडले होते. त्यावरून तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता पळता पळता चोर दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी 400 रुग्णालयांत जाऊन तपास केला.

Mumbai Crime :  तुमचे तुटलेले दातही कोठडीत पोहोचवू शकतात... चोरी करून पळाला; चार महिन्यांनी कसा सापडला ?
| Updated on: Oct 21, 2023 | 5:27 PM
Share

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कधी ना कधी सापडतोच. कायद्यापासून कधीही पळ काढू शकत नाही. केलेल्या कृत्याची शिक्षा (crime) इथेच भोगावी लागते. अशाच एका चोरालाही त्याच्या चोरीची, चार महिने उशीराने का होईना पण शिक्षा भोगावी लागलीच. मुंबईतील हा ‘स्पायडर-मॅन’ नावाने कुख्यात असलेला चोर त्याच्या दातांमुळे पकडला गेला.

दोन तुटलेल्या दातांमुळे मुंबईत एका चोराला चोरीच्या घटनेच्या चार महिन्यांनंतर पकडण्यात आले. बोरिवली येथे ‘स्पायडर मॅन’ म्हणून ओळखला जाणारा अज्ञात चोरटा चोरी करून पळून जात असताना दुसऱ्या मजल्यावरून पडला. यामुळे त्याचे दोन दात तुटले आणि पायही फ्रॅक्चर झाला. विशेष म्हणजे त्याच दोन तुटलेल्या दातांच्या मदतीने पोलिसांनी चार महिन्यांनी त्याला अटक केली. रोहित राठोड असे २९ वर्षीय चोरट्याचे नाव आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रोहित राठोड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरीचे १९ गुन्हे दाखल आहेत. रोहितची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बोरिवली आणि आसपासच्या 400 हून अधिक हॉस्पिटलमध्ये चौकशी केली होती. त्यानंतर त्याला दहिसर येथून अटक करण्यात आली. राठोडच्या अटकेमुळे पोलिसांना आणखी दोन गुन्ह्यांची उकल करण्यास मदत झाली.

रोहित राठोडला यापूर्वी डीएन नगर, कांदिवली, बोरिवली, वाकोला, सांताक्रूझ, दहिसर, कस्तुरबा मार्ग आदींसह अनेक पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी अटक केली होती.

कशी केली चोरी, मग कसं पकडलं ?

22 जून रोजी आरोपी रोहित हा राजाराम तावडे रोडवर असलेल्या अर्पिता या अपार्टमेंटमध्ये चोरी करण्यासाठी पोहोचला होता. येथे दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये त्याने चोरी केली. मात्र घरातील एका माणसाने त्याला चोरी करताना पाहिल्यावर इतरांना हाक मारली. पण तोपर्यंत रोहितने किचनच्या खिडकीतून उडी मारून पळ काढला. त्यात तो जखमी झाला पण तसाच पुढे पळाला. नंतर पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आली.

यानंतर एक टीम तयार करण्यात आली. पोलीस पथकाने तपास केला असता घटनास्थळी त्यांना दोन दात आढळून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता चोर उडी मारताना खाली पडलेला त्यांना दिसला. यामध्ये त्याचे दोन दात तुटले आणि पायही फ्रॅक्चर झाला. मात्र,अंधारामुळे चोराचा चेहरा फुटेजमध्ये दिसत नव्हता. जखमी होऊनही चोर भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला.

चोराला बराच मार लागल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात जाईल याचीही पोलिसांना खात्री होती. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली, पण चोर काही सापडला नाही. यानंतर दररोज वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करण्यासाठी एका पोलिसाची ड्युटी लावण्यात आली होती. गेल्या आठवड्यात वाकोल्यातील एका रुग्णालयात चोरट्यावर उपचार सुरू असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने पाहिले. यानंतर पोलिसांनी त्याला डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहिली. हॉस्पिटलमधून चोर घरी पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.