AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : म्हणून त्यानेच तिचा मृतदेह सूटकेसमध्ये कोंबला, कुर्ल्यातील ‘त्या’ हत्येचं रहस्य अखेर उलगडलं…

मृत महिला ही हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून कार्यरत होती, तर आरोपी सायनमध्ये एका मिठाईच्या दुकानात काम करायचा. लॉकडाऊनदरम्यान त्यांची ओळख झाली व ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले. मात्र महिलेच्या चारित्र्यावर आरोपीला संशय होता. त्यामुळे त्यांची अनेकदा भांडणं व्हायची

Mumbai Crime : म्हणून त्यानेच तिचा मृतदेह सूटकेसमध्ये कोंबला, कुर्ल्यातील 'त्या' हत्येचं रहस्य अखेर उलगडलं...
Image Credit source: social media
| Updated on: Nov 22, 2023 | 8:54 AM
Share

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : 19 नोव्हेंबर, रविवारी संपूर्ण देश वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये मग्न असताना, कुर्ल्यात मेट्रोचं काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बंद सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने सगळेच हादरले. मृत महिलेची ओळख पटवणारी कोणतीच खूण किंवा पुरावा नसातानाही, मुंबई पोलिसांनी अतिशय हुशारीने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. ही सूटकेस सापडल्यापासून अवघ्या एका दिवसांतच पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्या महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच या महिलेचा खून केल्याचे उघड झालं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिमा पवल किसपट्टा (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अस्कर बरला (वय 22)या तरूणाला अटक केली आहे. दोघेही लिव्ह -इन रिलशेनशिपमध्ये रहात होते. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

रविवारी कुर्ल्यातील मेट्रोचं काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बंद सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी थधाव घेऊन तपास सुरू केला. मृत महिला कोण याचा पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा तिच्या गळ्यात एक क्रॉस आढळला. त्यानंतर मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीची आधारे महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या.

दोन वर्षांपासून होते लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रतिमा ही एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून कार्यरत होती, तर आरोपी अस्कर सायनमध्ये एका मिठाईच्या दुकानात काम करायचा. ते दोघे मूळचे ओडिशाचे आहेत आणि कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान मुंबईहून त्यांच्या राज्यात परत येत असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. मुंबईत आल्यावर गेल्या दोन वर्षांपासून ते धारावीत एकत्र राहू लागले. पण आरोपी अस्कर याला प्रतिमाचा चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणं व्हायची.

याच मुद्यावरून रविवारी त्यांच्यात भांडण झाले. वादादरम्यान संतापलेल्या अस्करने प्रतिमाचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि सुटकेससह ओडिशाला जाण्याचा बेत आखला. मात्र लोकमान्य टिळक टर्मिनल्स स्थानकावर (LTT) पोहोचल्यानंतर त्याने प्लान चेंज केला आणि रिक्षात बसून तो मेट्रो कारशेड परिसरात पोहोचला. त्यानंतर त्याच परिसरात त्याने प्रतिमाच मृतदेह असलेली बॅग सोडली आणि तो पळून गेला.

अशी केली अटक

त्यानंतर पोलिसांना मृतदेह असलेली सूटकेस मिळाली आणि त्यांनी तपास सुरू केला. त्या महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरचे पहिले काम होते. पोलिसांना महिलेच्या गळ्यात एक क्रॉस सापडला. क्राईम ब्रँचच्या युनिट इलेव्हनने महिलेचा फोटो विविध चर्चमध्ये शेअर केला आणि केला आणि अखेरीस, अंधेरी येथे राहणाऱ्या मृताच्या बहिणीने तिची ओळख पटवली.

प्रतिमा ही गेल्या दोन वर्षांपासून अक्सरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे गुन्हे शाखेमजले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि क्राइम ब्रँचच्या युनिट 5 च्या अधिकाऱ्यांना तो ठाणे रेल्वे स्थानकावर सापडला. जिथून तो ट्रेनने ओडिशाला पळून जाणार होता. प्रतिमाची हत्या करण्याचा विचार नव्हता, रागाच्या भरात ती कृती घडल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान कबूल केले. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...