AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : आईचा फोन उचलेना, मित्रांनी गाठलं घर, खिडकीतून पाहिल्यावर हादरलेच, तरूणाने…

मुंबईतील वडाळा येथे प्रेमभंग आणि जातीय शिवीगाळामुळे एका 17 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ब्रेकअपमुळे आलेल्या मानसिक त्रासातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Mumbai Crime : आईचा फोन उचलेना, मित्रांनी गाठलं घर, खिडकीतून पाहिल्यावर हादरलेच, तरूणाने...
mumbai crime
| Updated on: Feb 18, 2026 | 9:57 AM
Share

प्रेमात पडलेली माणसं काहीही करू शकतात असं म्हणतात, पण काय भलं काय बुरं याचा सारासार विचार करण्याची क्षमताही कधीकधी गमवतात. मुंबईतील वडळा परिसरात प्रेमभंगातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमभंगानंतर झालेला मानसिक त्रास आणि जातीय शिवीगाळ यामुळे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 17 वर्षांच्या तरूणाने टोकाचं पाऊल उचललं. त्याने त्याचं आयुष्यच संपवलं. तरण्याताठ्या मुलाच्या जाण्याने त्याच्या आईवर तर अक्षरश: दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या, अल्पवयीन मैत्रिणीवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूण अवघ्या 17 वर्षांचा असून तो दिवा येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. तर त्याची आई ही ठाण्यातील एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करते. मुलाचे शिवडी येथे राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते, अशी माहिती त्याचा आईने दिली. मात्र गेल्या वर्षी, ऑक्टोबरमध्ये त्या दोघांचं भांडण झालं , नंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतरही मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. भांडणारनंतर त्या मुलाची प्रेयसी त्या टाळत होती., बोलत नव्हती, आणि तू खालच्या जातीच आहे, त्यामुळे मला तुझ्यासोबत रहायचं नाही असंही त्या मुलीने तरूणाला सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर त्या मुलीच्या कुटुंबीयांनी त्या मुलाला शिवडी इथं येण्यास मनाई केली होती. ब्रेकअपनंतर मुलीने सोशल मीडियावर इतर मुलांसोबतचे फोटो पोस्ट केलो हेतोस ते पाहून मुलाला आणखी त्रास झाला.

संध्याकाळी 5 ला झालं शेवटचं बोलणं आणि…

हा मुलगा दिव्याला शिकत होता. मात्र गेल्या महिन्यात, जानेवारी मध्ये तो शिर्डीला पायी चालत गेल्याने त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. त्यामुळेच तो गेल्या काही दिवसांपासून कॉलेजला जात नव्हता. घटनेच्या दिवशी, म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी मुलगा घरी एकटाच होता, आई हॉस्पिटलमध्ये कामावर गेली. संध्याकाळी 5 वाजात त्यांचं शेवटचं बोलणं झालं होतं.

काही वेळाने त्या महिलेने मुलाला पुन्हा फोन केला, पण बराच वेळ झाला तरी तो फोन उचलत नव्हता, काही रिप्लायही केला नाही. त्यामुळे आईला काळजी वाटू लागली. म्हणुून तिने मुलाच्या मित्रांना फोन केला आणि मुलगा ठीका आहे ना हे घरी जाऊन चेक करा असं सांगितलं. त्यानंतर त्या तरूणाचे मित्र घरी पोहोचले, त्यांनी दार वाजवलं पण कोणीच प्रतिसाद दिला नाही, दारंही उघडलं नाही. तेवढ्यात एका मित्राने घराच्या खिडकीतून आत पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखलची जमीनच सरकली. तरूण मुलगा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मित्रांना आढळला. त्यांनी तातडीने त्याच्या आईला व पोलिसांना कळवलं. प्रेमभंगातून मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत असून त्याची आई अतिशय शोकाकूल होती.

मुलीशी झालेलं ब्रेकअप, जातीयवादी टोमणे आणि सोशल मीडियावरील फोटो, या गोष्टींमुळे आलेल्या तणावामुळे आपल्य मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप मृत मुलाच्या आईने केला आहे. दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल