AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकतर्फी प्रेमातून 9 वीच्या विद्यार्थीनीची हत्या, मुंबईपासून 118 किमीवर मृतदेह नेऊन जाळला

तलासरी येथे 15 वर्षीय मुलीचा मृतदेह (Murder due to one side love in Poisar) मिळाल्याने एकच खळबळ उडाली. मृत मुलगी 9 वीच्या वर्गात शिकत होती.

एकतर्फी प्रेमातून 9 वीच्या विद्यार्थीनीची हत्या, मुंबईपासून 118 किमीवर मृतदेह नेऊन जाळला
| Updated on: Nov 19, 2019 | 4:23 PM
Share

मुंबई : तलासरी येथे 15 वर्षीय मुलीचा मृतदेह (Murder due to one side love in Poisar) मिळाल्याने एकच खळबळ उडाली. मृत मुलगी 9 वीच्या वर्गात शिकत होती. तिच्या कुटुंबीयांनी ऑक्टोबरमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार समता नगर पोलिस ठाण्यात दिली होती. ती पोयसरमधील जनिया कम्पाऊंड येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबरला मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाला. आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सुरुवातीला मृतदेह मिळाल्यानंतर जळलेला मृतदेहाची ओळख पटवणे कठिण गेले. समता नगर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीने ओळख पटवली. दरम्यान, मुलीच्या आईने आपल्या बेपत्ता मुलीचाच मृतदेह आहे, असा दुजोरा दिला. यानंतर पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे फिरवली. मुलीच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना तिच्या घराजवळ राहणाऱ्या 24 वर्षीय मुलावर संशय आला. मात्र, तो मुलगा फरार होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनचा आधार घेत त्याला 11 नोव्हेंबरला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने सांगितलं, “माझं तिच्यावर प्रेम होतं. मात्र, ती ऐकतच नव्हती. मी प्रयत्नपूर्वक 1 ऑक्टोबरला रात्री तिला घरी बोलावले आणि हत्या केली. मृतदेह नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरुन रात्रीतून तलासरी येथे नेला आणि तेथे पेट्रोल टाकून जाळला. न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.