AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Bike Theft : मेकॅनिकच निघाला बाईक चोर, चोरीच्या सहा बाईक केल्या जप्त

आरोपीकडून 6 चोरीच्या बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. इरफानकडून पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इरफान हा गाडी मेकॅनिक असून, त्यातून कमी उत्पन्न मिळत असल्याने त्याने हा मार्ग स्वीकारला.

Nagpur Bike Theft : मेकॅनिकच निघाला बाईक चोर, चोरीच्या सहा बाईक केल्या जप्त
मेकॅनिकच निघाला बाईक चोर, चोरीच्या सहा बाईक केल्या जप्तImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 12, 2022 | 8:03 PM
Share

नागपूर : दुचाकी दुरुस्त करणारा मेकॅनिकच बाईक (Bike) चोर निघाला आहे. गाडी दुरुस्त करता करता चोरीच्या गाडीचे सुटे भाग करून ते विकण्याचा धडाका लावला आणि आता तुरुंगात पोहोचला आहे. मोहम्मद इरफान असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जास्त पैसे कमवण्याच्या नादात आरोपी चोरीच्या मार्गाला लागला आणि तुरुंगात पोहचला. आरोपीकडून चोरी (Theft) केलेल्या सहा बाईक तहसिल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपीने आतापर्यंत किती बाईक चोरल्या आणि कुणाकुणाला त्याचे पार्ट्स विकले याबाबत तहसिल पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याच्या नादात चोरीच्या मार्गाला लागला

नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील मेयो रुग्णालयातून बाईक चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या चोरी प्रकरणाचा तपास करत असताना पोलिस मोहम्मद इरफानपर्यंत पोहचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून 6 चोरीच्या बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. इरफानकडून पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इरफान हा गाडी मेकॅनिक असून, त्यातून कमी उत्पन्न मिळत असल्याने त्याने हा मार्ग स्वीकारला. बाईक चोरी करून त्याचे सुटे भाग करून विकण्याचा धडाका लावला. कमी वेळेत कमी मेहनतीने जास्त पैसा मिळत असल्याने त्याला चोरी करण्याची सवय लागली. मात्र आता पोलिसांच्या जाळ्यात फसल्याने इरफानला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. (A mechanic who stole a bike and sold its parts was arrested by Nagpur police)

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल