AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati : मोठी बातमी! अमरावतीच्या मधील पंचवटी परिसरात अनोळखी बॅग सापडल्याने खळबळ, बॉम्बशोधक पथक तैनात

Amravati Crime News : हा घातपाचा कट आहे की आणखी काही, यावरुन आता अधिक तपास केला जातोय. संशयास्पद बॅगेबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिसांसोबत श्वान पथक, बॉम्बशोधत पथकही पंटवटी या ठिकाणी दाखल झालं आहे.

Amravati : मोठी बातमी! अमरावतीच्या मधील पंचवटी परिसरात अनोळखी बॅग सापडल्याने खळबळ, बॉम्बशोधक पथक तैनात
मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 12:22 PM
Share

अमरावती : अमरावतीच्या (Amravati Crime News) पंचवटी (Panchvati) परिसरात अनोळखी बॅग आढळून आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संशयास्पद बँगेची (Suspicious Bag) गंभीर दखल आता पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने घेतली आहे. हा घातपाचा कट आहे की आणखी काही, या अनुषंगाने अधिक तपास केला जातोय. संशयास्पद बॅगेबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिसांसोबत श्वान पथक, बॉम्बशोधत पथकही पंटवटी या ठिकाणी दाखल झालं आहे. सध्या या ठिकाणी कसून तपास केला जातो. संशयास्पद बँग आढळल्यानंतर आता अमरावतीमध्ये पोलीस यंत्रण सतर्क झाली आहे.

पाहा व्हिडीओ : नेमका काय प्रकार?

अमरावतीत चोख बंदोबस्त

बेवारस बॅग आढळून आल्यामुळे अमरावतीत पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. जागोजागी पोलीस यंत्रणा आता अधिक अलर्ट झाली आहे. गणेशोत्सवात पोलिसांकडून संपूर्ण राज्यभरातच चोख यंत्रणा उभी करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसली होती. आता गणपती विसर्जनानंतर 48 तासांतच अमरावतीत संशयास्पद बॅग आढळल्यानं सतर्कता बाळगली जातेय.

बँगमध्ये काय?

नेमकं या बॅगेमध्ये काय आहे? ही बॅग कुणी ठेवली? हा घातपाताचा कट तर नाही ना? पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आलाय का? असा अनेक प्रश्नांचं गूढ आता वाढलंय. या सर्व प्रश्नांच्या अनुशंगाने पोलीस तपास करत आहेत.

सध्या बॉम्बशोधक पथक पंचवटीत दाखल झालंय. या पथकाकडून अधिक शोध घेतला जातोय. त्यातून अनेक गोष्टींचा खुलासा होईल. दरम्यान, श्वान पथकाच्या मदतीनेही चौकशी केली जाते आहे. ही बॅग नेमकी कुणाची, यासाठीही पोलिसांकडून तपास केला जातो आहे. संपूर्ण प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचं अमरावतीत पाहायला मिळतंय.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.