डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार, अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: |

Updated on: Jun 27, 2021 | 11:00 AM

अमरावतीमधील शिवसेनेचा तिवसा शहरप्रमुख अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन ते तीन जणांनी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला

डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार, अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या
शिवसेना तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील

Follow us on

अमरावती : शिवसेनेच्या तिवसा शहर प्रमुखाच्या हत्येने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. 34 वर्षीय अमोल पाटील याची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. (Amravati Shivsena Tiosa City Chief Amol Patil Murder)

दोन वर्षासाठी तडीपारीचा आदेश

अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपार होण्याचा आदेशही काढला होता. अवैध उद्योगातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.

नेमकं काय घडलं

अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.

आरोपींचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती, मात्र अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही. राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या

याआधी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची पुण्यात निर्घृण हत्या झाली होती. राहत्या घरासमोर जयचंद चौकातच डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत त्यांना जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं

मध्य प्रदेशातील शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या

(Amravati Shivsena Tiosa City Chief Amol Patil Murder)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI