मध्य प्रदेशातील शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या

रमेश साहू यांनी जवळपास 10 वर्षांपेक्षा अधिक काळ मध्य प्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले होते

मध्य प्रदेशातील शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या

इंदूर : मध्य प्रदेशातील शिवसेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपींच्या हल्ल्यात रमेश साहू यांची पत्नी आणि मुलगीही जखमी झाल्या आहेत. घटनास्थळावरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. (Shiv Sena former Madhya Pradesh chief Ramesh Sahu killed in Umri Kheda near Indore)

इंदूरजवळील उमरी खेडा गावात रमेश साहू यांच्यावर गोळीबार करण्यात आला. रमेश साहू उमरी खेड्यात ‘साई राम ढाबा’ चालवत असत. ढाब्यावरच अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून रमेश साहू यांना ठार केले. त्यांच्या बचावासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे. हत्येनंतर आरोपी पसार झाले.

घटनास्थळावरुन कोणतीही वस्तू किंवा पैसा चोरीला गेलेला नाही. आरोपींनी केवळ रमेश साहू यांचा जीव घेतला. यामुळे पूर्ववैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रमेश साहू यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

रमेश साहू यांनी जवळपास 10 वर्षांपेक्षा अधिक काळ मध्य प्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले आहे. रमेश साहू यांच्या हत्येने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला आहे.

(Shiv Sena former Madhya Pradesh chief Ramesh Sahu killed in Umri Kheda near Indore)

Published On - 2:44 pm, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI