अमरावती हादरलं! 25 वर्षीय इंजिनिअर मुलीसह आईनेही का घेतला गळफास?

मायलेकींची एकत्र आत्महत्या! पती घरात नाही हे पाहून राहत्या घरातच का उचललं टोकाचं पाऊल?

अमरावती हादरलं! 25 वर्षीय इंजिनिअर मुलीसह आईनेही का घेतला गळफास?
अमरावतीमधील धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 11:11 AM

अमरावती : मायलेकींच्या आत्महत्येनं अमरावती (Amravati Suicide) शहर हादरुलंय. अमरावती शहरातील संमती शिक्षक कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. आत्महत्या करणाऱ्या तरुण मुलीचं नाव मृणाल वानखडे (Mrunal Wankhade) आहे. मृणाल इंजिनिअरींग शिकली होती. तर सोबत आत्महत्या करणाऱ्या तिच्या आईचं नाव सुवर्णा वानखडे आहे. या दोघींनीही राहत्या घरी पंख्याला गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. आई आणि मुलीच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अमरावती पोलीस (Amravati Crime News) या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

का केली आत्महत्या?

मुलगी मृणाल आणि तिची आई सुवर्णा या प्रदीप वानखडे यांच्यासोबत राहत होत्या. गाडगेनगर पोलिसांना या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे. प्रदीप वानखडे यांनी मुलीसह पत्नीलाही आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी शारिरिक आणि मानसिक छळ करत आत्महत्येसं प्रवृत्त केल्यामुळे आई-मुलीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पाहा लाईव्ह घडामोडी :

हे सुद्धा वाचा

सुवर्णा वानखडे या 51 वर्षांच्या होत्या. तर मृणाल वानखडे या 25 वर्षांच्या होत्या. तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रदीप यांचं वय 55 वर्ष आहे. सध्या पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जातेय.

प्रदीप वानखेडे हे शिक्षक म्हणून काम करतात. त्यांची मुलगी इंजिनिअरींग पूर्ण झाल्यानं पुण्यातील एका कंपनीत नोकरीला लागली होती. आत्महत्येची ही घटना जेव्हा घडली, तेव्हा संशयित आरोपी प्रदीप वानखडे हे शेगावला निघून गेले असल्याचंही सांगितलं जातंय.

अमरावती शहरातील आशिया कॉलनी परिसरात संमती कॉलनीत उघडकीस आलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपासही सुरु केला आहे. याच प्रकरणाशी संबंधिक सोन्याचे दागिने आणि रोकडही पोलिसांना एका मंदिराजवळ सापडली. दागिन्यासह रोकड पोलिसांनी जप्त केली असून पुढील चौकशी पोलिसांकडून केली जाते आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.