भाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं

चंद्रपुरात लोकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या बदमाशीची पोलखोल झाली आहे.

भाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं
दबदबा पडण्यासाठी बंदुकीसोबत फोटो टाकला, अरेच्छा ! ती तर निघाली खोटी पिस्तूल
निलेश डाहाट

| Edited By: चेतन पाटील

Jul 27, 2021 | 5:16 PM

चंद्रपूर : चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागतो. पण वाईट गोष्टी अलगद माणूस नकळत शिकतो. नकारात्मक गोष्टींकडे माणूस लवकर आकर्षित होतो. त्यात आजची तरुण पिढी गुन्हेगारी विश्वाकडे जास्त आकर्षिली जाताना दिसत आहे. अर्थात चांगल्या तरुणांची संख्याही चांगली आहे. पण दुसरीकडे काही तरुण गुन्हेगारी विश्वाकडे जास्त आकर्षिले जाताना दिसत आहेत. काही तरुणांना तर गुंडगिरी करण्याची हौस असते. पण अशा हौशी तरुणांना पोलीस बरोबर वठणीवर आणतात. असाच काहिसा प्रकार चंद्रपुरात बघायला मिळाला.

बंदूक खोटी, पोलिसांच्या तपासात माहिती समोर

लोकांमध्ये आपल्याप्रती भीती निर्माण करणे, एरियाचा भाई होणं, गुंड होणं अशा काहिंच्या महत्त्वकांक्षा आहेत. लोकांमध्ये दहशत माजवून पुढे काही तरुण मोठा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करतात. पण अशाच दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या बदमाशीची पोलखोल झाली आहे. चंद्रपूरच्या या तरुणाने फेसबुकवर हातात बंदूक घेतलेला फोटो शेअर केला होता. पण ती बंदूक खोटी होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली.

फेसबुकवर फोटो शेअर करणं अंगलटी

चंद्रपुरातील एका तरुणाने हातात बंदूक घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण त्याचा हाच प्रताप त्याच्या अंगलटी आला आहे. सोशल मीडियावर हातात बंदूक असलेला फोटो शेअर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं. यावेळी त्यांची भंबेरी उडाली. तो प्रचंड घाबरला. पोलिसांनी त्याला बंदुकीबाबत विचारलं तेव्हा भलतीच काहितरी माहिती समोर आली.

तरुणाला समज देऊन सोडून दिलं

तरुणाने शेअर केल्या फोटोतील बंदूक ही बनावट आणि खोटी होती. ही बंदूक ऑनलाईन खरेदी करण्यात आलेली होती. पोलिसांनी त्याचे पुरावे देखील तपासले. त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला नाही. बल्लापूर पोलिसांनी संबंधित तरुणाला समज देऊन सोडून दिलं. पण पुन्हा असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशीही ताकीद दिली. बल्लारपूर शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस सोशल मीडियातील बारीक-सारीक बाबींकडे देखील लक्ष देत आहे.

हेही वाचा :

आधी बलात्कार, मग शिक्षा, त्यानंतर स्वेच्छेने लग्न आणि फिरायला नेऊन हत्या, गुंतागुंतीची थरारक कहाणी

अब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें