पाच वर्षीय चिमुकली दूध घेण्यासाठी गोठ्यात गेली, 50 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ क्लिपमुळे संतापजनक प्रकार उघड

यवतमाळच्या उमरखेड भागात संतापजनक घटना समोर आली आहे. एका 50 वर्षीय नराधमाने अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत (Five-year-old girl sexually assaulted by 50-year-old accused in Yavatmal).

पाच वर्षीय चिमुकली दूध घेण्यासाठी गोठ्यात गेली, 50 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ क्लिपमुळे संतापजनक प्रकार उघड
प्रातिनिधिक फोटो

यवतमाळ : राज्यात मुली खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण यवतमाळच्या उमरखेड भागात संतापजनक घटना समोर आली आहे. एका 50 वर्षीय नराधमाने अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. संबंधित प्रकार हा एका व्हिडीओ क्लिपमुळे उघडकीस आला. आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला हा सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे (Five-year-old girl sexually assaulted by 50-year-old accused in Yavatmal).

पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव दाखल

संबंधित घटना ही 8 मे रोजी उमरखेडच्या साणकवाडी परिसरात घडली आहे. पाच वर्षीय पीडित मुलगी ही दूध आणण्याकरिता आरोपीच्या गोठ्यामध्ये गेली होती. दरम्यान, आरोपीने मुलीसोबत गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनंतर एका व्हिडीओ क्लिपमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत उमरखेड पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव दाखल झाला होता.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

सदर क्लिप बघून पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेत हकीकत सांगितली. पोलिसांनी सदर फिर्यादीच्या रिपोर्टवरून ताबडतोब गुन्हा नोंद केला. पोलीस आरोपीच्या घरी गेले असता आरोपी हा फरार झाला होता. आरोपींविरुद्ध 376 अ, ब भादंवीसह 4, 8 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत (Five-year-old girl sexually assaulted by 50-year-old accused in Yavatmal).

संबंधित बातमी : 39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI