VIDEO : चाकूचा धाक दाखवला, बॅगेतील 20 लाखांची रोख रक्कम लांबवली, नागपुरात भयानक थरार

नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूचा दाखवत चार चोरट्यांनी 20 लाख रुपये पळविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही इतवारी परिसरातील चितेश्वर मंदिर परिसरात घडली आहे.

VIDEO : चाकूचा धाक दाखवला, बॅगेतील 20 लाखांची रोख रक्कम लांबवली, नागपुरात भयानक थरार
चाकूचा धाक दाखवला, बॅगेतील 20 लाखांची रोख रक्कम लांबवली


नागपूर : नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूचा दाखवत चार चोरट्यांनी 20 लाख रुपये पळविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही इतवारी परिसरातील चितेश्वर मंदिर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. पण चोरट्यांनी तब्बल 20 लाखांची रक्कम लांबविल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणी चारही बाजूने तपास करत आहेत. तसेच पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

एका कुरियर कंपनीचा मॅनेजर पैसे घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात होता. या मॅनेजरजवळ 20 लाखांची रोख रक्कम होती. पण मॅनेजर आपल्या मालकाच्या घरी पैसे घेऊन जात असताना चार भामट्यांनी त्याला अडवलं. चोरट्यांनी मॅनेजरला चाकूचा दाख दाखवत बॅगेत काय आहे ते विचारलं? त्यानंतर बॅगेची चैन खोलत ती बॅग मॅनेजरच्या हातातून हिसकावली. त्यानंतर ते पळून गेले.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

मॅनेजरने तातडीने आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटनेची माहिती मालकाला दिली. मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस घटानस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज आहेत का याचाही तपास केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस लवकरच या घटनेचा उलगडा करुन आरोपींना बेड्या ठोकतील अशी आशा तक्रारदारांनी व्यक्त केलीय. दरम्यान, या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा सुरु आहे. नागपुरात चोरांची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, असं मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

नाशिकमध्ये सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास

दरम्यान, नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी चोरीची धक्कादायक घटना समोर आली होती. नाशिकमधील सराफा दुकानातून शुक्रवारी (24 सप्टेंबर) भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. नवीन नाशिकमधील बंदावणे नगर परिसरातील न्यू सद्गुरू ज्वेलर्स या सराफा दुकानात शुक्रवारी सकाळी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी 15 तोळे सोने आणि सहा हजारांची रोकड लंपास केली आहे. सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितले.

त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली. एकूण 150 ग्रमॅ वजनाचे हे सोने असून त्याची किंमत 7 लाखांच्या घरात आहे. या धाडसी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले. सराफा दुकानात आणि दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे चोरटे या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, सलग दुसऱ्या दिवशी हत्येच्या घटनेने कराड हादरलं

हॅपी बर्थडे बायको, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोटात चाकू खुपसला, नाशकातील धक्कादायक घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI