40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, सलग दुसऱ्या दिवशी हत्येच्या घटनेने कराड हादरलं

दिनकर थोरात

| Edited By: |

Updated on: Sep 26, 2021 | 11:46 AM

सातारा जिल्ह्यातील कराड-पुसेसावळी रस्त्यावरील वाघेरी जवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. रमेश रामचंद्र पवार (वय 40 वर्ष) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या, सलग दुसऱ्या दिवशी हत्येच्या घटनेने कराड हादरलं
अवघ्या 17 दिवसांपूर्वीच लग्न, डोळ्यात संसाराची स्वप्न अन् संशयास्पद मृत्यू

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात खुनांची मालिका सुरुच आहे. 40 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या दोन दिवसात हत्येच्या दोन घटना उघडकीस आल्यामुळे कराडवासियांमुळे घबराट पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करुन शनिवारी रात्री एकाचा खून केला. सातारा जिल्ह्यातील कराड-पुसेसावळी रस्त्यावरील वाघेरी जवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. रमेश रामचंद्र पवार (वय 40 वर्ष) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. धारदार शस्त्राने भोसकून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. कराड तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. कालच कराड शहरात महिलेचा धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच खुनाची दुसरी घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या

दुसरीकडे, सातारा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणाने 18 वर्षीय मुलीची भरदिवसा भर चौकात गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटना ही पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे. विशेष म्हणजे मुलीची हत्या करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चैतन्या बाळू बंडलकर असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर अनिकेत मोरे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

आरोपी दुचाकीने आला, मुलीसोबत न बोलताच तिची हत्या

संबंधित घटना ही चाफळ येथीव स्वागत कमानीजवळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी अनिकेत हा दुचाकीने आला होता. तो चैतन्यासोबत काहीच बोलला नाही. त्याने गाडीवरुन उतरुन आधी चैतन्याचं तोंड दाबलं. त्यानंतर दुसऱ्या हातात असलेल्या चाकूने तिची गळा चिरुन हत्या केली. चैतन्या रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर खाली कोसळली. या हल्ल्यात चैतन्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनिकेत दुचाकीने पोलीस ठाण्यात गेला. तिथे जमा होऊन त्याने आपल्या कृत्याची पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे गावातही खळबळ उडाली.

आरोपी अनिकेतची आधी मुलीच्या आईकडे लग्नाची मागणी

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मृतक चैतन्याची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी चाफळ नजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहत होत्या. आरोपी अनिकेत आणि चैतन्या एकाचा तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तिला भेटायला येत होता. अनिकेतने काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने चैतन्यासोबत लग्नाची मागणी घातली होती. पण अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. त्यामुळे याबाबत पुढे काही झालं नाही. त्यानंतर अचानक हत्येची घटना समोर आली.

हेही वाचा :

संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह 11 जणांवर गुन्हे

पतीचा चारित्र्यावर संशय, संतापलेल्या पत्नीकडून 3 लाखांची सुपारी, नागपुरातील महिलेने नवऱ्याचा काटा काढला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI