संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला

सातारा जिल्ह्यातून भयानक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणाने भरदिवसा 18 वर्षीय मुलीची भर चौकात गळा चिरुन हत्या केली आहे. संबंधित घटना ही पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे.

संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला
घटनास्थळाचा फोटो

सातारा : सातारा जिल्ह्यातून भयानक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणाने भरदिवसा 18 वर्षीय मुलीची भर चौकात गळा चिरुन हत्या केली आहे. संबंधित घटना ही पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी मुलीची हत्या करुन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चैतन्या बाळू बंडलकर असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर अनिकेत मोरे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

आरोपी दुचाकीने आला, मुलीसोबत न बोलताच तिची हत्या

संबंधित घटना ही चाफळ येथीव स्वागत कमानीजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी अनिकेत हा दुचाकीने आला होता. तो चैतन्यासोबत काहीच बोलला नाही. त्याने गाडीवरुन उतरुन आधी चैतन्याचं तोंड दाबलं. त्यानंतर दुसऱ्या हातात असलेल्या चाकूने तिची गळा चिरुन हत्या केली. चैतन्या रक्तबंबाळ अवस्थेत जमीनीवर खाली कोसळली. या हल्ल्यात चैतन्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनिकेत दुचाकीने पोलीस ठाण्यात गेला. तिथे जमा होऊन त्याने आपल्या कृत्याची पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे गावातही खळबळ उडाली.

आरोपी आणि मृतक मुलगी एकाच तालुक्यातील

आरोपी अनिकेतने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीसही हैराण झाले. मल्हारपेठ पोलीस तातडीने घटानस्थळी दाखल झाले. तसेच कराडचे पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटीलही घटनास्थळी दाखल झाले. खून झालेली चैतन्या आणि आरोपी अनिकेत दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत. चैतन्याचे मूळगाव वाठार किरोली, तर संशयित अनिकतचे गाव शिरंबे आहे, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली.

आरोपी अनिकेतची आधी मुलीच्या आईकडे लग्नाची मागणी

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मृतक चैतन्याची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी चाफळ नजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहत होत्या. आरोपी अनिकेत आणि चैतन्य एकाचा तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तिला भेटायला येत होता. अनिकेतने काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने चैतन्यासोबत लग्नाची मागणी घातली होती. पण अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. त्यामुळे याबाबत पुढे काही झालं नाही. त्यानंतर अचानक हत्येची घटना समोर आली.

वाढदिवशीच पेट्रोल टाकून जिवंत जाळले, बीडमधील धक्कादायक घटना

दरम्यान, बीड जिल्ह्यातही धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. ही धक्कादायक घटना धारुर घाटात घडली असून अर्धवट जळालेल्या तरुणाचे नाव कृष्णा गायकवाड असे आहे. अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्यामुळे तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर या घटनेतील चार संशयित आरोपी फरार आहेत.

हेही वाचा :

पतीचा चारित्र्यावर संशय, संतापलेल्या पत्नीकडून 3 लाखांची सुपारी, नागपुरातील महिलेने नवऱ्याचा काटा काढला

वाढदिवशीच पेट्रोल टाकून जिवंत जाळले, धारुर घाटात अर्धवट जळालेला तरुण पाहून खळबळ, बीड हादरलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI