भंडाऱ्यात संतापजनक प्रकार, मंचावर तरुणीचा विवस्त्रावस्थेत अश्लील डान्स, दोन पोलीस निलंबित

भंडाऱ्यातून अतिशय धक्कादायक आणि सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही इथे डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मंचावर मुली अश्लील नृत्य करतात. हे नृत्य तिथपर्यंतच मर्यादीत राहत नाही तर मंचावरील तरुणीचे कपडे काढून, तिला निर्वस्त्र करुन नाचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भंडाऱ्यात संतापजनक प्रकार, मंचावर तरुणीचा विवस्त्रावस्थेत अश्लील डान्स, दोन पोलीस निलंबित
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 7:17 PM

भंडारा | 23 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रातील संस्कृतीचं आणि संस्काराचं सर्वत्र कौतुक होतं. आपली संस्कृती जपली जावी, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. अनेक जण बोलीभाषा वाचावी यासाठी प्रयत्न करत आहेत. कुणी मराठी भाषेसाठी काम करत आहे. काहीजण कलेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून देत आहेत. लोककलेसाठी आतापर्यंत अनेक दिग्गजांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे. लोककलेत समाज प्रबोधनाचा एक आत्मा आहे, असं मानलं जातं. लोककलांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलं जातंच, पण त्यासोबत समाजप्रबोधन केलं जातं. त्यामुळे गावागावांमध्ये लोककलेचे कार्यक्रम होता. तमाशा हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. पण आता अनेक ठिकाणी डान्सचे कार्यक्रम आयोजित केले जातात. डान्सचे कार्यक्रम आयोजित करणं यात काहीच गैर नाही. पण कार्यक्रमांमध्ये अश्लील, उत्तेजित करणारे नृत्य सादर केले जातात. त्यामुळे अनेकांकडून याबाबत चिंता व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे भंडाऱ्यात तर अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाने टोकच गाठलं आहे. इथे जो कार्यक्रम झालाय, त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

भंडाऱ्यातला हा प्रकार सुन्न करणारा आहे. या कार्यक्रमात मंचावर मुली अश्लील नृत्य करतात. हे नृत्य तिथपर्यंतच मर्यादीत राहत नाही तर मंचावरील  एका तरुणीचे कपडे काढून, तिला निर्वस्त्र करुन नाचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र या प्रकरणावर संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे या कार्यक्रमात दोन पोलीस कर्मचारी होते. पण हे पोलीस देखील संबंधित प्रकार रोखू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरही आता कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही इथे मंडई निमित्त आयोजित हंगामा कार्यक्रमात विवस्त्रावस्थेतील अश्लील डान्स करण्यात आला. हा कार्यक्रम 17 नोव्हेंबरला पार पडला. त्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. अश्लीलतेचा कळस गाठणारा हा व्हिडिओ समोर येताच, पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आर के डान्स हंगामा ग्रुपच्या तिघांसह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आणि अश्लील व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कलम 354, 354 ब, 294, 509 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमात हजर असतानाही कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल करत आहेत.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....