AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Gang rape : 35 वर्षीय महिलेवर गँगरेप! 26 दिवसानंतरही मुख्य आरोपी मोकाट, सामाजिक संघटनांची निदर्शनं

Gondia Crime News : गोंदिया गँगरेप प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी दोोघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. पण मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना अजूनही यश मिळू शकलेलं नाही. यासाठी 24 सामाजिक संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी धरणं आंदोलन केलं होतं.

Gondia Gang rape : 35 वर्षीय महिलेवर गँगरेप! 26 दिवसानंतरही मुख्य आरोपी मोकाट, सामाजिक संघटनांची निदर्शनं
गोंदियात धरणं आंदोलनImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 6:40 AM
Share

गोंदिया : गँगरेप प्रकरणातील (Gondia Bhandara Gang rape case) मुख्य आरोपीला (Main Accused in rape case) पकडण्यात पोलिसांना (Gondia Police) यश न आल्यानं सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात. त्यांनी निदर्शनं करत पोलिसांच्या कार्यक्षमेतवर सवाल उपस्थित केलेत. गोंदियात 35 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचा गुन्हा दाखल होऊन आता 26 दिवसही उलटून गेले. पण तरिही पोलिसांच्या हातावर तुरी देत मुख्य आरोपी मोकाटच आहे. मुख्य संशयित आरोपीचं रेखाचित्रही जारी करण्यात आलं. तसंच एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली. मात्र तरिही मुख्य आरोपीला अटक करण्यात विलंब का होतोय, असा सवाल सामाजिक कार्यकत्यांनी उपस्थित केलाय. या बाबीवर लक्ष वेधण्यासाठी रविवारी धरणं आंदोलन करण्यात आलं होतं.

24 सामाजिक संस्थांची एकत्रित हाक!

गोंदिया गँगरेप प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. पण मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना अजूनही यश मिळू शकलेलं नाही. यासाठी 24 सामाजिक संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी धरणं आंदोलन केलं. या आंदोलनावेळी सामाजिक संघटनांनी घटनेचा तीव्र निषेध केला. तसंच मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणीही केली.

नेमकं काय आहे प्रकरण?

मदतीचे आश्वासन देऊन गोंदिया आणि भंडाऱ्यात सामूहिक बलात्कार करण्यात आलेला होता. गोंदियातील 35 वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेत संतापजनक कृत्य केलेलं होतं. अत्याचार केल्यानंतर पीडितेला रस्त्याकाठी फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता. पीडितेवर सध्या नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपीना अटक केली आहे. मात्र पहिला आणि मुख्य आरोपी, ज्याने महिलेवर गोंदिया येथे अत्याचार केला, तो अजूनही फरार आहे.

या संतापजनक घटनेचं गांभीर्य ओळखून एसआयटीही स्थापन करण्यात आलेली होती. दरम्यान आता नेमकी मुख्य आरोपीला अटक केव्हा होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गँगरेपच्या घटनेला 26 दिवस उलटून गेले तरी अजून एसआयटी आणि पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरुच आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.