Nagpur Crime : पत्नी म्हणाली ‘पाणी भरा’, मग निवृत्त क्लास वन अधिकारी संतापला अन् पुढे जे घडलं ते भयंकर

पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे एकाच घरात दोघे वेगवेगळे रहायचे. मात्र दोघांमधील वाद थांबण्याचे नावच घेत नव्हते. अखेर या वादाचा भयंकर शेवट झाला.

Nagpur Crime : पत्नी म्हणाली पाणी भरा, मग निवृत्त क्लास वन अधिकारी संतापला अन् पुढे जे घडलं ते भयंकर
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 14, 2023 | 10:03 AM

नागपूर / 14 ऑगस्ट 2023 : पत्नीने पाणी भरण्यास सांगितले म्हणून संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केली. नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील घटना घडली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, पतीला अटक केली आहे. पुरूषोत्तम कुमार सिंह असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी निवृत्त क्लास वन अधिकारी आहे. तर मुकुलकुमारी सिन्हा असे मयत पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पती-पत्नीमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरु होते. त्यातच पत्नीने पाणी भरायला सांगितल्याने पती संतापला आणि मग हे भयंकर कृत्य घडले.

सिन्हा दाम्पत्यात वाद होते

सिन्हा दाम्पत्यामध्ये वारंवार वाद व्हायचे. दोघांचे पटत नव्हते. त्यातच पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तो पत्नीचा मानसिक छळ करत असे. यामुळे एकाच घरात दोघे पती-पत्नी वेगळे राहत होते. काही दिवसांपूर्वी पत्नीने पतीविरोधात कोराडी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत काढून दोघांमध्ये समेट घडवून आणला होता.

पाणी भरण्यावरुन वाद झाला आणि भलतंच घडलं

रविवारी सकाळी पत्नीने पतीला पाणी भरण्यास सांगितले. यामुळे पतीला राग आला आणि तो शिवीगाळ करु लागला. पत्नीनेही पतीला प्रत्त्युत्तरात शिवीगाळ आणि मारहाण केली. यामुळे पुरुषोत्तम अधिकच संतापला. पुरुषोत्तमने घरातली कुऱ्हाडीने आणली पत्नीच्या डोक्यात घातली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात.

घटनेची माहिती मिळताच कुराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.