Mira Road Crime : मीरा रोडमध्ये खाजगी क्लास शिक्षकावर भररस्त्यात हल्ला, हल्ल्याचे कारण अस्पष्ट

खाजगी क्लासेसचा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत उभा होता. यादरम्यान अचानक जे घडलं त्याने सारेच हादरले. यानंतर शिक्षकाला थेट रुग्णालयातच जावे लागले.

Mira Road Crime : मीरा रोडमध्ये खाजगी क्लास शिक्षकावर भररस्त्यात हल्ला, हल्ल्याचे कारण अस्पष्ट
अज्ञात कारणातून शिक्षकावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 3:04 PM

मीरा रोड / 12 ऑगस्ट 2023 : अज्ञात कारणातून खाजगी क्लासेसच्या शिक्षकावर हल्ला झाल्याची घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. जखमी शिक्षकावर मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राजू ठाकूर असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकावर हल्ला केल्यानंतर आरोपी स्वतःहून काशीमिरा पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपी अल्पवयीन आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपीने हे कृत्य का केले याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत. चौकशीअंती हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल.

विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना शिक्षकावर हल्ला

पीडित शिक्षक राजू ठाकूर यांचे पेणकर पाडा परिसरात गुजराती चाळ येथे ठाकूर अकॅडमी नावाचे खाजगी क्लासेस आहेत. इयत्ता बारावीपर्यंत हे क्लासेस आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास राजू ठाकूर हे इतर विद्यार्थ्यांसोबत बोलत उभे होते. यावेळी अल्पवयीन आरोपी तेथे आला आणि त्याने ठाकूर यांच्यार चाकूहल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात ठाकूर हे गंभीर जखमी झाले. जखमी शिक्षकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसंकडून तपास सुरु

आरोपीने हा हल्ला का केला? याबाबत अद्याप कळू शकले नाही. हल्ल्यानंतर अल्पवयीन आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. काशीमीरा पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 326 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तपासानंतर सत्य उघड होईल.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.