डिझेल संपल्याने ट्रॅक्टर थांबलेला, मागून बाईक जोरात आदळली, तरुणाचा जागीच मृत्यू

| Updated on: Mar 03, 2022 | 2:06 PM

अकोला जिल्हातील मुर्तिजापूरमध्ये बाईक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी चालकाने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

डिझेल संपल्याने ट्रॅक्टर थांबलेला, मागून बाईक जोरात आदळली, तरुणाचा जागीच मृत्यू
अकोल्यात ट्रॅक्टर-बाईकचा अपघात
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

अकोला : रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रॅक्टरला बाईकने (Bike Accident) मागून धडक दिली. या भीषण अपघातात एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अकोला जिल्हातल्या मुर्तिजापूरमध्ये (Murtijapur Akola) हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे (Tractor) डिझेल संपल्याने तो रस्त्याच्या बाजूला उभा होता. मात्र रात्रीच्या अंधारात बाईक चालकाला याचा अंदाज न आल्यामुळे तो मागील बाजूने त्यावर आदळला. ही धडक इतकी जबरदस्त होती, की 33 वर्षीय तरुणाला घटनास्थळीच प्राण गमवावे लागले. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं?

अकोला जिल्हातील मुर्तिजापूरमध्ये बाईक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी चालकाने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

डिझेल संपल्याने ट्रॅक्टर थांबलेला

मूर्तिजापूरकडून दर्यापूरकडे वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे डिझेल संपले होते. त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याच वेळी मूर्तिजापूरकडे येणाऱ्या दुचाकीने या ट्रॅक्टरला मागून धडक दिली.

एकाचा जागीच मृत्यू

या अपघातात वाशिम जिल्ह्यातल्या जोडगव्हाण येथील 33 वर्षीय किशोर सुदाम गवई याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी शेख रज्जाक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

बसची बाईकला जोरदार धडक, तिघा जीवलग मित्रांचा करुण अंत

ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर 

महाशिवरात्री यात्रा अखेरची ठरली, मित्राला सोडून परतताना बाईक झाडावर आदळली, तरुणाचा जागीच अंत