राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या, गडचिरोलीत पोलीस जवानाचे टोकाचे पाऊल

गडचिरोलीतील (Gadchiroli) अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जवान कार्यरत होता. प्रमोद शोकोकर असे मयत जवानाचे नाव आहे. तो मूळ बुलडाणा येथील रहिवासी होता.

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या, गडचिरोलीत पोलीस जवानाचे टोकाचे पाऊल
गडचिरोलीत आमदार आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 9:54 AM

गडचिरोली : गडचिरोलीतील आमदाराच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या (Police Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmrao Baba Atram) यांच्या सुरक्षेत तैनात पोलीस शिपायाने टोकाचं पाऊल उचललं. स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. गडचिरोलीतील (Gadchiroli) अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जवान कार्यरत होता. प्रमोद शोकोकर असे मयत जवानाचे नाव आहे. तो मूळ बुलडाणा येथील रहिवासी होता. ताडगाव पोलीस स्टेशन येथून काही दिवसांपूर्वीच तो आमदार धर्मराव आत्राम आमदार यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाला होता. कुटुंबातील तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आहे.

काय आहे प्रकरण?

गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात पोलीस शिपायाने आत्महत्या केली. स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जवान कार्यरत होता. ताडगाव पोलीस स्टेशन येथून काही दिवसांपूर्वीच तो आमदार धर्मराव आत्राम आमदार यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाला होता.

प्रमोद शोकोकर असे मयत जवानाचे नाव आहे. तो मूळ बुलडाणा येथील रहिवासी होता.  कौटुंबिक ताण तणावातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आहे.

धर्मराव बाबा आत्राम कोण आहेत?

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा एक मध्यबिंदू मानला जातो. या विधानसभेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम चार वेळा निवडून आले आहेत. आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. अहेरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र तिथे खिंडार पडल्यानंतर धर्मराव बाबांचा एकदा अपक्ष दीपक आत्राम आणि दुसऱ्यांदा पुतणे आणि भाजप उमेदवार अंबरीश आत्राम यांनी पराभव केला होता. मात्र 2019 मध्ये धर्मराव बाबांनी पुन्हा निवडणूक जिंकली.

संबंधित बातम्या :

आई रागावली म्हणून घेतले विष, पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन, नेमकं काय घडलं?

मुलीच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी मृतदेह सापडला, बापाने जंगलात पुरला, पोलिसांनी दोन वर्षांनी उकरला

लग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! बुलडाण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला