ज्यानं अ‍ॅसिड हल्ला केला, त्या पतीला सोडवण्यासाठी चक्क पत्नीची याचना! म्हणते ‘सोडा त्याला, नवराच तर आहे’

Nagpur acid attack : अ‍ॅसिड हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यानंतरही पत्नीचं पतीवरचं प्रेम उफाळून आलं असून तिनं पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पत्नीनं पतीच्या सुटकेसाठी पोलिस स्थानकात जात माझ्या नवऱ्याला सोडा, अशी मागणी या पत्नीनं केली आहे.

ज्यानं अ‍ॅसिड हल्ला केला, त्या पतीला सोडवण्यासाठी चक्क पत्नीची याचना! म्हणते 'सोडा त्याला, नवराच तर आहे'
नागपुरातील पती पत्नीवर हल्ला करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 7:31 PM

नागपुरातील अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणाचं (Nagpur Acid Attack on wife by Husband) सीसीटीव्ही गेल्या काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. दरम्यान, या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला अटक करण्यात आली असून अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) जिच्यावर करण्यात आला होती, तिनंच चक्क पतीच्या सुटकेसाठी पोलिसांकडे विनवणी सुरु केली आहे. हल्ला करणाऱ्या पतीला सोडवण्यासाठी ही महिला सध्या पोलिसांकडे याचना करु लागली आहे. तीन वर्षांपासून पतीपत्नीमध्ये वाद सुरु होता. कौटुंबिक वादातूनच (family dispute) पतीनं पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर पतीनं अ‍ॅसिडसारखं द्रव्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. याप्रकरणामुळे एकच खळबळ उडालेली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी असलेल्या पतीला अटक केली. मात्र अखेर पत्नीला पतीचीच दया आली असून तिनं पतीच्या सुटकेसाठी पोलिसांकडे विनवण्या सुरु केल्यात.

विभक्त झाले, पण…

तीन वर्षापासून पती-पत्नीमध्ये टोकाचा वाद झाला होता. यानंतर ते दोघे हल्लीच विभक्तही झाले होते, अशीही माहिती समोर आली आहे. या दाम्पत्याला एक बारा वर्षांची मुलगी आणि एक दहा वर्षांचा मुलगादेखील आहे. पतीपासून वेगळं झाल्यानंतर पत्नी पोळ्या लाटण्याचं काम करु लागली होती. काम करण्यासाठी सायकलवरुन जात असतानाच पतीन तिच्यावर अ‍ॅसिडनं हल्ला केला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला होता.

अ‍ॅसिड हल्ल्यात पत्नी जखमी

या हल्ल्यात पत्नी थोडक्यात बचावली होती. तिला किरकोळ जखमही झालेली. यानंतर पत्नीवर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. अ‍ॅसिड हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यानंतरही पत्नीचं पतीवरचं प्रेम उफाळून आलं असून तिनं पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पत्नीनं पतीच्या सुटकेसाठी पोलिस स्थानकात जात माझ्या नवऱ्याला सोडा, अशी मागणी या पत्नीनं केली आहे.

अ‍ॅसिडहल्ला करणाऱ्या पतीनचं नाव सुरेश झेंगटे असं असून त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा असून या मुलांच्या भवितव्याचा प्रश्नही आपल्या पालकांच्या भांडणामुळे उभा ठाकलाय. 22 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीच पतीचा शोध घेत त्याला अटकही केली होती.

पाहा धक्कादायक सीसीटीव्ही –

संबंधित बातम्या :

भयंकर! दुसरीही मुलगी झाल्याचा राग, नवऱ्यानेच बायकोच्या गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसला

‘लग्नाच्या जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात जुळतात!’ मुंबई उच्च न्यायालयानं असं नेमकं का म्हटलं?

हैवानतेचा कळस! नराधम बापासह भावाचाही बलात्कार! आईची डोळेझाक, कल्याणमधील हादरवणारी घटना

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.