धक्कादायक! प्रवाशांनी कॅब चालकाला लुटले, मारहाणीत चालक जखमी, पोलिसांनी आरोपींना ‘अशा’ ठोकल्या बेड्या

नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन चोरट्यांनी कॅब चालकाला जबर मारहाण करत लुटले. आरोपींमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

धक्कादायक! प्रवाशांनी कॅब चालकाला लुटले, मारहाणीत चालक जखमी, पोलिसांनी आरोपींना अशा ठोकल्या बेड्या
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 9:23 PM

नागपूर : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन चोरट्यांनी कॅब चालकाला (Cab Driver) जबर मारहाण करत लुटले. आरोपींमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. चोरट्यांनी (Thieves) कॅब बुक केली होती. कॅब बुक केल्यानंतर त्यांनी कॅब चालकाला त्यांना जिथे जायचे आहे तिथला पत्ता सांगितला. दरम्यान कॅब नियोजित स्थळी पोहोचताच या तिघांनी मिळून चाकूचा धाक दाखवत चालकाला लुटले. चालकाला आरोपींनी बेदम मारहाण देखील केली. या घटनेमध्ये चालक जखमी झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. आरोपींची चौकशी केली असता, यापूर्वी देखील त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

चाकूचा धाक दाखवत मारहाण

कॅब चालकाने ग्राहकाला लुटले किंवा मारहाण केली अशा अनेक घटना आपण ऐकत असतो. मात्र नागपुरात उलटे घडले आहे. प्रवाशांनीच कॅब चालकाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करण असे या कॅब चालकाचे नाव आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, करण याला रात्री अकराच्या सुमारास आयचीत मंदिरापासून ते सोमलवादा मंदिरापर्यंतची बुकिंग आली. तो जिथे हे दोन महिला आणि पुरुष उभे होते, तिथे गेला. त्यानंतर आरोपी गाडीत बसले.  कॅब सोमलवादाकडे जात होते. निर्धारीत स्थळाजवळ येताच, आरोपींनी चालकाला चाकू दाखवून मारहाण केली. तसेच त्याच्याजवळी सर्व पैसे घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेत कॅब चालक जखमी झाला आहे.

असे पकडले आरोपी 

दरम्यान जखमी चालकाने पोलीस ठाणे गाठत संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून , आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. ओलाच्या अ‍ॅपवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढला व आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

Shocking | ‘आई-पप्पा’ या दोन शब्दांव्यतिरीक्त काहीही बोलता न येणाऱ्या गतीमंद मुलीवर नराधमांचा बलात्कार

Nanded : तो आधी महिलांना एकांतात गाठायचा, त्यांचे हातपाय बांधायचा! मग त्यांच्या अंगावरील…

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…