भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…

मामीने विरोध केल्यावर त्याने मामाच्या मोबाईलवर तिचा न्यूड व्हिडीओ पाठवला. व्हिडिओ समोर येताच मामीने मामाच्या मदतीने गोला मंदिर पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने...
प्रातिनिधिक छायाचित्र.

भोपाळ : भाच्याने मित्राच्या मदतीने आपल्या मामीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये गँगरेपचा प्रकार घडला. कामाच्या निमित्ताने खोलीत बोलावून दोघांनी हे दुष्कृत्य केलं. सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी आरोपीने मामीला गुंगीचे औषध पाजले होते. मामीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओही नराधम भाच्याने शूट केल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना 31 डिसेंबरच्या संध्याकाळी ग्वाल्हेरमधील हनुमान नगर गोला मंदिरात घडली होती. यानंतर भाच्याने मामीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

घटनेच्या दोन दिवसांनी आरोपींनी मामीला पुन्हा आपल्या खोलीत बोलावले. मामीने विरोध केल्यावर त्याने मामाच्या मोबाईलवर तिचा न्यूड व्हिडीओ पाठवला. व्हिडिओ समोर येताच मामीने मामाच्या मदतीने गोला मंदिर पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

टिकमगड येथे राहणारी 21 वर्षीय कविता (नाव बदलले आहे) तिच्या पतीसोबत ग्वाल्हेरमधील गोल का मंदिर येथे असलेल्या हनुमान नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. कविताचे पती शेजारीच मजुरीचे काम करतात. याच ठिकाणी काही अंतरावर तिच्या पतीचा भाचा राहतो. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी भाच्याने मामीला फोन करून काही तातडीचे काम असल्याने घरी येण्यास सांगितले.

गँगरेप करुन व्हिडीओ शूट

मामी जेव्हा भाच्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याचा मित्र आकाश माहूर हाही तिथे होता. दोघांनी मामीला प्यायला पाणी दिलं. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्याचवेळी भाचा आणि त्याच्या मित्राने मामीवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचे निर्वस्त्र व्हिडीओ शूटही केले.

मामाला जीवे मारण्याची धमकी

कोणालाही काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करून मामाला गोळ्या घालू, अशी धमकी घटनेनंतर दोन्ही आरोपींनी दिली. यानंतर घाबरलेली महिला घरी परतली, मात्र आरोपी भाच्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नऊ जानेवारी रोजी आरोपीने फोन करून महिलेला घरी येऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

न्यूड व्हिडीओ मामाला पाठवला

भाच्याच्या या मागणीचा मामीने विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या भाच्याने बलात्काराच्या वेळी मामीचा शूट केलेला न्यूड व्हिडिओ रविवारी मामाच्या मोबाईलवर पाठवला. मामाने घरी पोहोचताच तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तिने संपूर्ण घटना सांगितली.

यानंतर मामा-मामी दोघांनी गोला मंदिर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

नवीन मित्रांना द्यायचा चोरीचे प्रशिक्षण, अट्टल चोराचा साथीदार अटकेत; मुख्य आरोपीला केव्हा होणार अटक?

रस्त्यात बाईक अडवली, सासऱ्याला खाली पाडून सून पायावर बसली, निवृत्त पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

लैंगिक शोषण करुन पीडितेचा गर्भपात, अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला अटक

Published On - 3:02 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI