अहमदनगर : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याच सुनेने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या मदतीने अन्य दोघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. वृद्धाला खाली पाडून त्याच्या तोंडात जबरदस्ती विष ओतण्याचा प्रयत्न तिघा आरोपींनी केला. या घटनेत सेवानिवृत्त पोलिसाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेन्शनर पोलीस असल्याने तुला पोलिसांनी अटक केली नाही, आता तुला कोण वाचवणार, असे म्हणत सुनेने त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.