Nanded : तो आधी महिलांना एकांतात गाठायचा, त्यांचे हातपाय बांधायचा! मग त्यांच्या अंगावरील…

Nanded Theft : नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं पोलिसांनी कारवाई करत एक अट्टल चोरट्याला अटक केली आहे. या चोरट्यानं लूटमार करण्यासाठी वापरलेली पद्धत ऐकून पोलिसांही हादरुन केले आहेत.

Nanded : तो आधी महिलांना एकांतात गाठायचा, त्यांचे हातपाय बांधायचा! मग त्यांच्या अंगावरील...
crime

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चोरट्यानं चोरीसाठी जे केलंय, तो प्रकार अंगावर काटा आणणारा, असाच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक चोरटा महिलांना एकांतात गाठून त्यांना लुटत होता. अनेक चोऱ्या (Theft) अशा प्रकार करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटकदेखील केली आहे. फक्त एकांतात हा चोरटा महिलांना गाठत नव्हता. तर एकांतात गाठल्यानंतर हा चोरटा महिलांचे हातपाय बांधायचा. त्यानंतर हातपाय बांधलेल्या महिलांच्या अंगावरील दागिन्यांवर हात साफ करण्याचा सपाटा या चोरट्यांनी लावला होता. या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं होतं. अखेर पोलिसांनी (Nanded Police) या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. आता पोलिस या चोरट्याची अधिक कसून चौकशी करत असून त्यातून काय नेमकी माहिती समोर येते, हे पाहणंही महत्त्वाचंय.

नांदेडमध्ये नेमकं कुठे?

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं पोलिसांनी कारवाई करत एक अट्टल चोरट्याला अटक केली आहे. या चोरट्यानं लूटमार करण्यासाठी वापरलेली पद्धत ऐकून पोलिसांही हादरुन केले आहेत. हा चोरटा महिलांवर पाळत ठेवून त्यांना एकांतात आधी गाठायचा. त्यानंतर आजूबाजूला कुणी नाही, हे पाहून चोरटा महिलांचे हात पाय बांधायचा. हात पाय बांधलेल्या महिलांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करुन हा अट्टल चोरटा पसार व्हायचा.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्यानंतर पोलिसांनी अखेर मोठ्या शिताफीनं या अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात. नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलिसांनी या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरी केलेले दागिनेदेखील जप्त केले आहेत. दरम्यान लुटमार करण्यासाठी जी दुचाकी चोरटा वापरत होता, ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे. देगलूरच्या तपास अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती आहे.

सध्या या चोरट्याची पोलीस कसून चौकशी करत आहे. या चौकशीतून असे प्रकार करणारा हा चोरटा एकटाच आहे की त्याची टोळी आहे, याबाबतही अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे पोलिस आता पुढील दिशेनं तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

CCTV | भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, मग चाकूने भोसकलं, नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ

आजीची हत्या करुन दागिन्यांची चोरी, नांदेडमध्ये पाच दिवसात नातू जेरबंद

प्रेयसीच्या बापाकडून प्रियकराचा सिनेस्टाईल खून, मृतदेह शेतात पुरला, महिन्याभराने उलगडा


Published On - 3:37 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI