तो मध्यप्रदेशातून नागपुरात यायचा, काही दिवस मुक्काम ठोकायचा, नंतर संधी साधून जे करायचा ते ऐकून पोलीसही चक्रावले

सुनील ढगे

| Edited By: |

Updated on: Sep 02, 2021 | 3:59 PM

नागपूरच्या धंतोली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मध्यरात्री योग्य संधी साधून नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

तो मध्यप्रदेशातून नागपुरात यायचा, काही दिवस मुक्काम ठोकायचा, नंतर संधी साधून जे करायचा ते ऐकून पोलीसही चक्रावले
तो मध्यप्रदेशातून नागपुरात यायचा, काही दिवस थांबून दुचाकी चोरी करायचा

Follow us on

नागपूर : नागपूरच्या धंतोली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मध्यरात्री योग्य संधी साधून नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे आरोपी स्वत:ची चैन भागवण्यासाठी दुचाकी चोरी करायचा. तो जुगार आणि इतर व्यसन पूर्ण करण्यासाठी वाहने चोरी करायचा, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या तब्बल 13 दुचाकी जप्त केल्या आहेत.

संबंधित दुचाकी चोराचं नाव संदीप टेंभरे असं असल्याची माहिती समोर आली आहे. तो खरंतर मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. पण नागपुरात दुचाकी चोरीच्या उद्देशाने यायचा. तो नागपुरात येत-जात असायचा. काही दिवस नागपुरात राहायचा. तो नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरायचा. त्या दुचाकी तो मध्यप्रदेशात घेऊन जायचा. तिथे तो आपल्या ओळखीच्या लोकांकडे दुचाकी गहाण ठेवायचा. त्यांच्याकडून त्यामोबदल्यात मिळालेल्या पैशातून आपल्या चैन भागवायचा. आरोपी त्या पैशांमधून दारुचं व्यसन करायचा. तसेच जुगार खेळायचा.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. वारंवार दुचाकी चोरीच्या तक्रारी येत असल्याने पोलिसांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवली. या दरम्यान त्यांना आरोपी संदीप टेंभरे सापडला. त्याला पोलिसांनी काही प्रश्न विचारले असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. यावेळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

आरोपीचा कबुली जबाब

आरोपीने आतापर्यंत 13 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्या दुचाकी नेमक्या कुणाकडे गहाण ठेवल्या याची देखील माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करत त्या सगळ्या दुचाकी जप्त केल्या. पोलिसांना आरोपीने आणखी काही दुचाकी चोरल्याची शंका वर्तवली आहे. पोलीस आरोपीची आणखी चौकशी करत आहेत. या चौकशीत आणखी काही चोरीच्या घटना उघड होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय करायचं ते ठरवताना विचार करावा

आपण कधीही कोणतीही गोष्ट करताना विचार करणं जास्त आवश्यक आहे. आपण निवडलेला मार्ग आपल्याला नेमक्या कुठल्या ठिकाणी घेऊन जाईल याचा अंदाज आपण बांधायला हवा. तसेच आपण कोणता मार्ग अवलंबतोय याचाही चारवेळा विचार करावा. अन्यथा पश्चतापाशिवाय दुसरं काहीच हाती राहत नाही, हेच या प्रकरणातून लक्षात येतंय. या प्रकरणातील आरोपी तरुणाने स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग आता त्याला पोलिसांच्या कस्टडीपर्यंत घेऊन आला आहे. त्यामुळे असे मार्ग निवडताना युवा पिढीने विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

हेही वाचा :

8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, धमकावून अपहरण करत अत्याचार, नागपुरातील प्रकार

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI