बेलफुल वाटणाऱ्या आजी अचानक बेपत्ता, दोन दिवसांनी ऊसाच्या शेतात मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ

पुसद तालुक्यातील आरेगाव येथे बेलफुल वाटणाऱ्या वृद्धेचा ऊसाच्या शेतात मृतदेह आढळल्याने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाली होती.

बेलफुल वाटणाऱ्या आजी अचानक बेपत्ता, दोन दिवसांनी ऊसाच्या शेतात मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ
बेलफुल वाटणाऱ्या आजी अचानक बेपत्ता, दोन दिवसांनी ऊसाच्या शेतात मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ

यवतमाळ : पुसद तालुक्यातील आरेगाव येथे बेलफुल वाटणाऱ्या वृद्धेचा ऊसाच्या शेतात मृतदेह आढळल्याने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. महिलेच्या कुटुंबियांकडून तिचा शोध सुरु होता. पण आज (1 ऑगस्ट) ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. अज्ञात आरोपींनी चोरीच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

नेमकं प्रकरण काय?

पुसदपासून 8 किमी अंतरावरील आरेगाव येथील यशोदाबाई कोंडबा सातव (वय 60 वर्षे) ही विधवा महिला दररोज लोणी या गावात बेलफुल वाटायची. ही महिला दोन दिवसांपूर्वी (30 ऑगस्ट) भरपूर पाऊस पडत असल्याने काही काळ लोणी येथे थांबली होती. या दरम्यान पावसाने उघडीप देताच आपल्या गावाकडे निघाली. पण दोन दिवसांपासून ही महिला घरी परतलीच नाही. महिलेच्या नातेवाईकांनी तिचा प्रचंड शोध घेतला. पण तिचा पत्ता लागत नव्हता.

ऊसाच्या शेतात महिलेता मृतदेह आढळला

बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी बुधवारी (1 ऑगस्ट) महिलेचा मृतदेह महादेव मंदिरालगत असलेल्या जोडरस्त्यावरील संजय चिद्दरवार यांच्या शेतात आज आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.

पोलिसांचा तपास सुरु

महिलेचा मृतदेह हा संशयितरित्या सापडला आहे. तिच्या अंगावरील सर्व दागिने गायब आहेत. तसेच तिचे पायही दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळले. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या गळ्यात सोन्याची पाने, हातात चांदिचे कडे आणि पाटल्या गायब आहेत. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने आरोपी महिलेचं अपहरण करुन सर्व दागिने हिसकावले. त्यानंतर तिची हत्या केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पण मृतदेहाच्या शवविच्छदन अहवालातच मृत्यूचं खरं कारण उघडण्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

ऊसाच्या शेतात 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह

गेल्या महिन्यात हरियणात अशीच काहिशी घटना समोर आली होती. हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील बॉम्बेपूर गावात एका तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले होते. ऊसाच्या शेतात तरुणाचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला होता. ही माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृताच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. मृत व्यक्तीचे नाव नाझीम असून तो बॉम्बेपूरचा रहिवासी आहे, अशी माहिती समोर आली होती.

हेही वाचा :

सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या, हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख, परभणीत खळबळ

आठ दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त, डुकराच्या शिकारीवरुन झालेल्या हाणामारीत बापाचा मृत्यू, बीडमधील भयानक घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI