नागपुरात बलात्कार पीडितेची आत्महत्या, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?

नागपुरात बलात्कार पीडित एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही नागपुरात जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

नागपुरात बलात्कार पीडितेची आत्महत्या, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 5:52 PM

नागपूर : नागपुरात बलात्कार पीडित एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही नागपुरात जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. पीडितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाल्याने पीडिता नाराज होती. पण पीडितेने आत्महत्येआधी सुसाईड नोट लिहिलेली नाही. त्यामुळे पीडितेच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी सध्या जरीपटका पोलिसांचा तपास सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित अल्पवयीन मुलगी ही नागपुरात आपले वडील, भाऊ आणि सावत्र आईसोबत राहत होती. पीडित मुलीच्या सावत्र आईचा नातेवाईक असलेला आरोपी विकास भुजाडे याने जून महिन्यामध्ये तिला घरुन फूस लावून बंगळुरु येथे पळवून नेले होते. घटनेनंतर पीडितेच्या आईने नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी एक महिन्यानंतर जुलै महिन्यात आरोपी आणि पीडित तरुणीला बंगळुरु येथून नागपुरात आणले होते.

आरोपीची जामिनावर सुटका

नागपुरात आल्यानंतर पीडितेने तिच्यासोबत झालेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला होता. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाकडून नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत विकास भुजाडे या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यासंदर्भात चार्जशीट सुद्धा दाखल झाली होती. त्यानंतर आरोपी जामिनावर सुटला होता. आरोपी जामिनावर सुटल्यापासून पीडिता नाराज होती, अशी माहिती समोर आली आहे.

पीडितेचं आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

या दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र त्यात आरोपीचा या संबंधित केसनंतर पीडित परिवाराशी संबंध आला नसल्याचं दिसून आलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, पीडितेच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

महाराष्ट्रात वारंवार बलात्काराच्या घटना

महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. पुणे, अमरावती, उल्हासनगर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटना तसेच मुंबईतील निर्भया हत्याकांडासारखी भयानक घटना ताजी असताना जालना जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बदनापूर तालुक्यातील एका गावात मंगळवारी (14 सप्टेंबर) दुपारी पीडित मुलगी घरासमोर एकटी कोंबड्यांना दाणे टाकत होती. यावेळी तिच्या घरात इतर सदस्य नव्हते. याच गोष्टीची संधी साधून बाजूच्या शेतात राहणाऱ्या आरोपी अनवर खान याने मुलीला जबरदस्ती आपल्या घरात नेलं. तिथे तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. पीडित मुलीने शेतात काम करणाऱ्या आपल्या आईला ही हकीकत सांगितल्याने मुलीच्या आईने बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

महाराष्ट्र ATS ची टीम दिल्लीत, संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेखची चौकशी करणार

बलात्काराच्या घटनेवर लोकं भडकली, रस्त्यावर मोठा गदारोळ आणि जाळपोळ, गर्दी नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून गोळीबार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.