नागपूरच्या ड्रग्स तस्करांचं मुंबई कनेक्शन, मालाडमधून मामूला बेड्या, नागपुरात तिघांच्या मुसक्या आवळल्या

सुनील ढगे

| Edited By: |

Updated on: Jul 11, 2021 | 6:02 PM

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन ड्रग्स तस्करांना अटक केली आहे (Three arrested for drugs trafficking in Nagpur).

नागपूरच्या ड्रग्स तस्करांचं मुंबई कनेक्शन, मालाडमधून मामूला बेड्या, नागपुरात तिघांच्या मुसक्या आवळल्या
नागपूरच्या ड्रग्स तस्करांचं मुंबई कनेक्शन, मालाडमधून मामूला बेड्या, नागपुरात तिघांच्या मुसक्या आवळल्या

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 82 ग्रॅम 84 मिलीग्रॅम एमडी ड्रग्स पावडर जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्सची किंमत तब्बल 8 लाख 28 हजार 400 रुपये इतकी आहे. तीनही अटक आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे या सर्वांना ड्रग्स पुरणावऱ्या मुंबई येथील मामू नावाच्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे (Three arrested for drugs trafficking in Nagpur).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त बातमीदार कडून मिळाली होती की, गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा नाका ते नविन काटोल नाका चौकाकडे रिंग रोडवर असलेल्या झोपडपट्टी भागात अंकित गुप्ता, रितीक गुप्ता आणि रूपम सोनकुसरे हे तीन ड्रग्सची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे एनडीपीएसच्या पथकाने सापळा रचून तीनही आरोपींना शिताफीने अटक केली (Three arrested for drugs trafficking in Nagpur).

आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून 82 ग्रॅम 84 मिली ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर जप्त केले, ज्याची किंमत 8 लाख 28 हजार 400 रुपये इतकी आहे. या शिवाय गुन्ह्यात उपयोगात आणलेली एक कार आणि तीन मोबाईल फोन सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत. ज्यामुळे एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 11 लाख 55 हजार रुपये इतकी झाली आहे.

मुंबईत मामूला बेड्या

अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या तीनही आरोपींची चौकशी केली तेव्हा त्यांना मुंबई येथील मामू नावाच्या इसमाने ड्रग्स पुरावल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी एनडीपीएसचं एक पथक मुंबईला रवाना करण्यात आलं. तांत्रिक मदतीने आरोपीचा मुंबई शहरात विविध ठिकाणी शोध घेण्यात आला. अखेर आरोपी मेहंदी हाशमी नजमुल सैय्यद उर्फ मामू याला मालाड भागातून अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे ड्रग्स तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र पोलिसांनी आणखी खोलात जाऊन यांची मूळ कापण्याची गरज आहे.

हेही वाचा : 

नगर परिषदेच्या सभापतीकडून सामाजिक कार्यकर्त्यांची सुपारी देऊन हत्या, वाचा हत्येनंतरच्या 15 दिवसांच्या नाट्यमय घडामोडी

मृतकांच्या आत्मशांतीसाठी अमावस्येच्या रात्री प्रेत जागृती, अघोरी प्रकाराने मलकापूर शहर हादरलं

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI