आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसूती, प्रसूतीदरम्यान बाळ दगावल्यानं संताप! यवतमाळमधील धक्कादायक प्रकार

Yavatmal News : शुभांगी सुदर्शन हापसे, या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे या महिलेला टाकळी येथून उमरखेड इथं प्रसूतीसाठी आणण्यात आलं होतं. विडुल इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्याला उपचार मिळतील, या अपेक्षेने या महिलेला आणण्यात आलं. पण....

आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसूती, प्रसूतीदरम्यान बाळ दगावल्यानं संताप! यवतमाळमधील धक्कादायक प्रकार
आरोग्य यंत्रणेवर सवाल उपस्थित करणारी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 9:29 AM

यवतमाळ : राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर (Maharashtra Health) सवाल उपस्थित करणारी घटना यवतमाळ (Yavatmal Crime News) जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेची प्रसुती चक्क आरोग्य केंद्राच्या (Yavatmal Health centre) गेटवर झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुर्दैवी बाब म्हणजे या महिलेचं पोटातील बाळ प्रसूतीदरम्यान दगावल्यानं संताप व्यक्त केला जातोय. यवतमाळ तालुक्याच्या उमरखेड इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिलेला योग्य उपचार मिळू न शकल्यामुळे तिचं बाळ दगावलं असल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असलेल्या विडूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला आहे. प्रसूतीदरम्यान, महिलेचं बाळ दगावल्यानं कुटुंबीयांनीही राग व्यक्त करत आरोग्य यंत्रणेवर टीका केलीय. ज्यावेळी या महिलेची प्रसुती झाली, त्यावेळी रुग्णालयात कुणीच उपस्थित नव्हते, असंही सांगितलं जातंय.

प्रसूतीदरम्यान बाळ दगावलं

शुभांगी सुदर्शन हापसे, या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे या महिलेला टाकळी येथून उमरखेड इथं प्रसूतीसाठी आणण्यात आलं होतं. विडुल इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्याला उपचार मिळतील, या अपेक्षेने या महिलेला आणण्यात आलं. पण तिथं आल्यानंतर या महिलेची उपेक्षा झाली, असा आरोप कुटुंबीयांनी केलाय. या महिलेचा आरोग्य केंद्राच्या गेटवरच प्रसूती झाली आणि प्रसूतीदरम्यान या महिलेचं बाळ दगावलं. त्यामुळे पीडित महिलेले कुटुंबीय राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर संतापले होते. व्हिडीओ रेकॉर्ड करत आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारावर कुटुंबीयांनी सवाल उपस्थित केलेत. विशेष म्हणजे रुग्णालयात कुणीच नव्हतं, असा सनसनाटी आरोप करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटवर

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच यवमाळमध्ये एका गर्भवती महिलेला आधार कार्ड नाही म्हणून उपचार नाकारण्यात आले होते. 10 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती. अखेर काही सजग नागरिकांनी या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. वेळीच उपचार मिळाले म्हणून या महिलेचा जीव आणि तिचं बाळ थोडक्यात बचावले होते. या प्रकारानंतर जिल्हा रुग्णालयावर सडकून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता उमरेख येथील विडूलमध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटनेनं यवतमाळमधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटवर असल्याची टीका केली जातेय. या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणीही केली जातेय.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.