AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस स्थानकातून ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला, सीसीटीव्हीमुळे चोरटा जेरबंद

कपड्यातील पैशांचे पाकीट, त्यामध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे पाकिटातून काढून फक्त 900 रुपये रोख रक्कम लंपास करुन बस स्थानकाच्या बाहेर मशीन आणि कपडे फेकून दिले होते.

बस स्थानकातून ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला, सीसीटीव्हीमुळे चोरटा जेरबंद
यवतमाळ बस स्थानकातील चोरीचे सीसीटीव्ही फूटेज
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 1:05 PM
Share

यवतमाळ : बस स्थानकावर विश्रांतीला थांबलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला गेली. यवतमाळमध्ये घाटंजी बस स्थानकावर हा प्रकार घडला. चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्यामुळे पोलिसांनी केवळ एका तासात त्याला जेरबंद केले.

नेमकं काय घडलं?

घाटंजी बस स्थानकावर यवतमाळ डेपोची बस क्रमांक MH07-9437 रात्री थांबली होती. हॉल्ट असल्यामुळे ड्रायव्हर-कंडक्टर कुमरे आणि सीडाम बस स्थानकाच्या रुममध्ये रात्री विश्रांती घेत थांबले होते. त्यावेळी रात्री जवळपास दीड वाजताच्या सुमारास एका चोरट्याने चक्क चालक-वाहकाती बॅग, खाकी वर्दी आणि तिकीट फाडण्याची मशिन चोरून नेली.

कपड्यातील पैशांचे पाकीट, त्यामध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे पाकिटातून काढून फक्त 900 रुपये रोख रक्कम लंपास करुन बस स्थानकाच्या बाहेर मशीन आणि कपडे फेकून दिले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली.

सीसीटीव्ही फूटेजमुळे चोरटा जेरबंद

फुटेजमध्ये पाठमोरा दिसणारा चोरटा हा गजानन हिरालाल राठोड (रा. शिवपुरी तालुका कळम) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घाटंजी पोलिसांनी त्याला केवळ एका तासात जेरबंद करुन गजाआड केले आहे.

नागपूरमध्ये एटीएममधून हायटेक चोरी

दुसरीकडे, एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे चोरणाऱ्या सायबर गॅंगला नुकतंच नागपूर पोलिसांनी जयपूरमधून अटक केली आहे. अनिस अब्दुल गफ्फुर आणि मोहमद तारीफ उमर हरियाणा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांनी देशभरात अशाप्रकारे लूट केली असून त्यांची मोठी गॅंग असण्याचा संशय पोलिसांना आहे.

संबंधित बातम्या :

एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक

म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत

(Yawatmal Ghatanji Bus Station Driver Conductor Bag Uniform theft)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.