हात एकमेकांना ओढणीने बांधले, नागपुरात 12 वर्षांच्या मुलीसह पती-पत्नीची आत्महत्या

जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये या कुटुंबाने आत्महत्या केली

हात एकमेकांना ओढणीने बांधले, नागपुरात 12 वर्षांच्या मुलीसह पती-पत्नीची आत्महत्या

नागपूर : नागपुरात एका पती-पत्नीने मुलीसह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक (Nagpur Family Commit Suicide) घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली. जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये या कुटुंबाने आत्महत्या केली (Nagpur Family Commit Suicide).

नागपूर जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये एका दाम्पत्याने मुलीसह सामूहिक आत्महत्या केली. श्याम गजानन नारनवरे (वय 46), सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी तिघांची नावे आहेत. हे दाम्पत्य नागपूरच्या वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्राजवळ दुचाकी उभी असल्यानं स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनालस्थळ गाठलं. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढले.

यावेळी तिघांचे हात एकमेकांना ओढणीने बांधलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या तिघांनी एकत्र सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. तरीही या तिघांनी आत्महत्येसारखं टोकांचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी वेलतूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय.

Nagpur Family Commit Suicide

संबंधित बातम्या :

छत्तीसगडच्या माजी मंत्र्याच्या सून आणि नातीची हत्या, बंद घरात मृतदेह सापडले

Crime | संपत्तीचा हव्यास, घराचा ताबा मिळावा म्हणून आईचे शव 10 वर्ष फ्रीजमध्येच लपवले!

दुसऱ्या व्यक्तीशी कसं लग्न करते? विचारत तरुणीवर प्राणघातक हल्ला, एकतर्फी प्रेमातून मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न

Published On - 9:50 am, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI