Nagpur Crime : मोबाईलवर बोलता-बोलता तोल गेला आणि ७ व्या मजल्यावरून थेट खाली कोसळला..

मोबाईलच्या नादात तरूणाला जीव गमवावा लागला. सोमवारी रात्री बजाज नगर भागात हा दुर्दैवी अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

Nagpur Crime : मोबाईलवर बोलता-बोलता तोल गेला आणि ७ व्या मजल्यावरून थेट खाली कोसळला..
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 10:56 AM

नागपूर | 20 सप्टेंबर 2023 : आजकाल सगळे जण मोबाईलमध्येच (mobile) व्यस्त असतात. लहान असोत वा मोठे प्रत्येकाचं डोकं आणि मन मोबाईलमध्ये गुंतलेलं असतं. पण त्याच मोबाईलचा नाद जीवावरही बेतू शकतो. अशीच एक अतिशय धक्कादायक आणि तेवढीच दुर्दैवी घटना (crime news) नागपूर शहरात घडली आहे. मोबाईलच्या नादापायी एका इसमाला त्याचा जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. अवघ्या १९ वर्षांचा तो तरूण मोबाईलवर बोलत असताना उंच इमारतीवरून खाली कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरम शहरा सोमवारी रात्रीच्या सुमारास बजाज नगर येथे हा अपघात घडला. एका बांधकामाधीन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका १९ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी मंगळवारी स्पष्ट केले. अखिलेश धुर्वे असे मृत मजुराचे नाव असून तो काही काळासाठी या निर्माणाधीन इमारतीमध्येच रहात असल्याची माहितीही समोर आली आहे.

बजाज नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9:30 च्या सुमारास मृत इसम धुर्वे हा त्याच्या एका नातेवाईकासोबत फोनवर बोलत होता. तो संभाषणात एवढा गुंग झाला होता की चालता -चालता तो पुढे आल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही. अचानक त्याचा तोल गेला आणि तो सातव्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता, असे पोलिसांनी नमूद केले.

तो खाली कोसळल्याचा आवाज येताच बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर सहकारी कामगारांनी तेथे धाव घेतली. जखमी धुर्वे याला तातडीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ठाण्यात आढळला वृद्ध डॉक्टरचा मृतदेह

दरम्यान, दुसर्‍या एका घटनेत, ठाणे शहरातील शीळ-डायघर परिसरात मंगळवारी एका वृद्ध डॉक्टरचा मृतदेह त्याच्या दवाखान्यापासून थोड्याच अंतरावर रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या शरीरावर अगणित जखमा आढळल्याची माहिती समोर आली आहे.

शीळ डायघर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिराज खान (65) असे त्या वृद्ध डॉक्टरचे नाव असून ते मुंब्रा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या क्लिनिकपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर बऱ्याच खोल जखमा होत्या. सरकारी रुग्णालयात त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

मृत डॉक्टर हे त्यांच्या दवाखान्याजवळच्याच एका इमारतीत रहात होते व क्लिनीकचे काम संपवून दुपारी १ वाजता ते घरी जाण्यास निघाले होते. मात्र ते घरी पोहोचलेच नाही, आणि थोड्या वेळाने त्यांचा मृतदेह सापडला असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांच्या क्रमाबद्दल सुगावा मिळविण्यासाठी पोलीस त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Non Stop LIVE Update
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे.