Nanded Crime : नांदेडमध्ये मोबाईल विक्रेत्यावर तलवारीने जबर हल्ला! घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nanded Crime : हल्लेखोर दोघेही जण पळून जाण्याच्या इराद्यात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सिनेस्टाईल पाठलाग करत अटक केलीय.

Nanded Crime : नांदेडमध्ये मोबाईल विक्रेत्यावर तलवारीने जबर हल्ला! घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नांदेडमध्ये हल्ला...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 12:03 PM

नांदेड : नांदेडमधील (Nanded Crime News) खंडणीखोर गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्याला कारण ठरलंय, एका दुकानदारावर झालेला जीवघेणा हल्ला! एका मोबाईल विक्रेत्यानं चक्क धारदार तलवारीने हल्ला करत पैशांची मागणी करण्यात आली. या हल्ल्यामध्ये तरुण मोबाईल विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जीवघेण्या हल्ल्याची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video of Attack) कैद झाली आहे. यानंतर संपूर्ण नांदेडमध्ये खंडणीखोर गुंडांची दहशत पसरली आहे. पैसे उकळण्याच्या उद्देशाने दोघा जणांनी मिळून मोबाईल विक्रेत्याच्या दुकानावर हल्ला चढवला होता. यावेळी मोबाईल विक्रेत्याला एका गल्लीत आणत त्याला धमकावण्यात आलं. तसंच त्याला मारहाणही करत धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात मोबाईल विक्रेता जखमी झाला. याप्रकरणी नांदेड पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर या हल्ल्याप्रकरणातील दोघे आरोपी पळून जात असताना पोलिसांनी (Nanded Police) त्यांच्या मुसक्या आवळल्यात.

नेमका कुठे झाला हल्ला?

नांदेडच्या चिखलवाडी भागात ही धक्कादायक घटना घडली. मोबाईल विक्रेते अब्दुल रौफ यांच्या दुकानावर दोघांनी येऊन धमकावलं. यावेळी त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने दोघांनी अब्दुल रौफ यांच्यावर हल्ला केला. अब्दुल रौफ यांच्याशी वाद घालत दोघे जण त्यांना मारहाण करत असतानाही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

या हल्ल्यामध्ये दोघेही जण धमकावल्यानंतर पळून गेले. त्यानंतर जखमी झालेल्या अब्दुल रौफ यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, हल्लेखोर दोघेही जण पळून जाण्याच्या इराद्यात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सिनेस्टाईल पाठलाग करत अटक केलीय. आता हल्लेखोरांची कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय.

हे सुद्धा वाचा

गुंडांना पोलिसांचा धाक आहे की नाही?

काही महिन्यांपूर्वी खंडणीच्या उद्देशानं संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. महिन्याभरापूर्वीच पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला होता. त्यादरम्यान, खंडणीखोर गुंडावरही नांदेड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र आता पुन्हा एकदा नांदेड शहरात छोट्या मोठ्या गुंडांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केल्याचं या घटनेवरुन समोर आलं आहे. त्यामुळे नांदेड पोलीस खंडणीखोड गुंडांवर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, हल्लेखोर गुंडांवर कठोरातली कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी जखमी मोबाईल विक्रेते अब्दुल रौफ यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.