धक्कादायक | ती 23 वर्षांची, डॉक्टर होणार होती, घरच्यांनी गळाच आवळला, मृतदेह जाळला, राखही ओढ्यात…. नांदेडमध्ये खळबळ

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 11:02 AM

खोटी सामाजिक प्रतिष्ठा राखण्यापायी आणखी किती लेकीबाळींचे बळी घेतले जाणार, समाजात परिवर्तन घडण्यास आणखी किती काळ लागणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.

धक्कादायक | ती 23 वर्षांची, डॉक्टर होणार होती, घरच्यांनी गळाच आवळला, मृतदेह जाळला, राखही ओढ्यात.... नांदेडमध्ये खळबळ
Image Credit source: tv9 marathi

राजीव गिरी, नांदेडः प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीच नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर बनू पाहणाऱ्या एका 23 वर्षीय लेकीची तिच्या कुटुंबियांनी हत्या केल्याचं समोर आलंय. खोट्या प्रतिष्ठेपायी (Honor Killing) आपल्याच लेकीचा गळा आवळून तिचा निष्ठूरपणे खून (Murder) केला. एवढंच नाही तर तिचा मृतदेह परस्पर जाळला. तिची राख जवळच्याच ओढ्यातही फेकून दिली.. पोटच्या गोळ्याला एवढ्या क्रूरतेने मारताना बापाचे हात सरसावलेच कसे, असा सवाल विचारण्यात येतोय. नांदेड (Nanded) जिल्ह्यात या घटनेनं खळबळ माजली आहे. खोटी सामाजिक प्रतिष्ठा राखण्यापायी आणखी किती लेकीबाळींचे बळी घेतले जाणार, समाजात परिवर्तन घडण्यास आणखी किती काळ लागणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.

काय घडलं नेमकं?

नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केली .. शुभांगी जोगदंड असं मयत मुलीचं नाव आहे . 23 वर्षीय सुभांगी BAMS मध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती ..

गावातील तरूणासोबत तिचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नवहतं .. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरे एक स्थळ पाहून तिचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आठच दिवसात हे लग्न मोडायला भाग पाडलं..

त्यामुळे गावात बदनामी झाली आणि याच रागातून आम्ही तिचा खून केल्याची कबुली कुटुंबियांनी दिली. रागाच्या भरात आपल्याच लेकीचा गळा आवळल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

रविवारी रात्री म्हणजेच 22 जानेवारी रोजी रात्री शुभांगीची कुटुंबियांनी हत्या केली. तिचा मृतदेह शेतातच जाळला. तसंच बाजूच्याच ओढ्यात ती राख टाकून दिली.

तीन दिवसांपासून बेपत्ता

शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यामुळे मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा सुरु झाली. शुभांगी नेमकी कुठे हरवली, याची शोधाशोध सुरु झाली. गुप्त बातमीदाराने यासंबंधी पोलिसांकडे माहिती दिली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.. तेव्हा ऑनर किलिंगचा हा प्रकार उघड झाला .. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडील , मामा भाऊ आणि काकाची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI