AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : इगतपुरीत मेंढ्या चारायला गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

आधी मोनिकाचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आई पपाबाई गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. यावेळी पपाबाईचा मुलगाही तिथे उपस्थित होता. त्याने ही सर्व घटना पाहिल्यानंतर त्याने गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले. माजी पोलीस पाटील कचरू वाकचौरे यांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला याबाबत कळवले.

Nashik Crime : इगतपुरीत मेंढ्या चारायला गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू
इगतपुरीत मेंढ्या चारणाऱ्या मायलेकींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 12:49 AM
Share

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे विहिरी (Well)त बुडून (Drowned) मेंढपाळ मायलेकींचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पपाबाई राजेंद्र गोयकर (35) आणि मोनिका राजेंद्र गोयकर (15) अशी मयत मायलेकींची नावे आहेत. पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी अरुण शंकर भगत यांच्या शेतातील विहीरीत आज दुपारी या मायलेकी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेल्या असता ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलीला वाचवण्यासाठी आई गेली अन् दोघीही बुडाल्या

आधी मोनिकाचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आई पपाबाई गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. यावेळी पपाबाईचा मुलगाही तिथे उपस्थित होता. त्याने ही सर्व घटना पाहिल्यानंतर त्याने गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले. माजी पोलीस पाटील कचरू वाकचौरे यांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला याबाबत कळवले. यावेळी पोलीस हवालदार विलास धरणकर यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गोविंद तुपे यांना बुडालेले मृतदेह काढण्यासाठी बोलवले. त्यांनी पाण्याचा अंदाज घेऊन मायलेकीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मायलेकीचे मृतदेह घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी पोलीस राजू पाटील, विलास धारणकर, मौले आदी उपस्थित होते. (A mother and her daughter who were grazing sheep in Igatpuri drowned in a well)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.