नाशकात तोतया विधानसभा उपाध्यक्षाला बेड्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 12:26 PM

नाशकातल्या वणीमध्ये (Nashik Wani) तोतया विधानसभा उपाध्यक्ष (Deputy Speaker of the Assembly) आणि आमदार (MLAs) म्हणून फिरणाऱ्या आणि अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल आहेर असे त्याचे नाव आहे.

नाशकात तोतया विधानसभा उपाध्यक्षाला बेड्या
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः वणीमध्ये (Nashik Wani) तोतया विधानसभा उपाध्यक्ष (Deputy Speaker of the Assembly) आणि आमदार (MLAs) म्हणून फिरणाऱ्या आणि अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल आहेर असे त्याचे नाव आहे. लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करून गंडा घालणे, लोकप्रतिनिधींच्या नावाचे बनावट लेटरपॅड बाळगणे, इनोव्हा कारवर बनावट राजमुद्रित लोगो लावून फिरणे असे आरोप आहेर याच्यावर आहेत. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी (Nashik Police) सुनावली आहे. (In Nashik-Wani, a person was arrested for cheating using the names of Deputy Speaker of the Assembly and MLAs)

राहुल दिलीप आहेर नावाचा एक भामटा लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करून अनेकांना गंडा घालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. त्यांनी राहुल आहेर (रा. शिंदवड, ता. दिंडोरी, हल्ली मुक्काम नाशिक) याला बेड्या ठोकल्या. तेव्हा त्याच्याजवळील इनोव्हा कारमध्ये लोकप्रतिनिधींचे बनावट लेटरपॅड आढळून आले. सोबतच तो ज्या कारमधून प्रवास करत होता, त्या कारवर बनावट राजमुद्रित लोगो लावलेला आढळला. वणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून आहेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेकांना गंडा घातल्याची शक्यता

आहेर याने विधानसभा उपाध्यक्ष व माजी आमदारांच्या नावाचा गैरवापर करून अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, राहुलच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. सरकारी वकिलांनी पुढील तपासासाठी राहुलच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन आहेर याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आहेर याने विधानसभा उपाध्यक्ष व माजी आमदाराच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे समजते. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. आहेर विरोधात इतर ठिकाणीही तक्रारी दाखल आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. आता न्यायालयानेही त्याला पुन्हा तीन दिवसांची कोठडी सुनावल्याने तपासाला वेग येणार आहे.

मिरा भाईंदरच्या आमदाराच्या नावे पैशांची मागणी

दरम्यान, मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. जैन यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअॅप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला होता. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करून पैशांची मागणीही करण्यात आली होती.

महापालिका अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते

नाशिकमध्ये सायबर फसवणुकींच्या गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापूर्वी नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी संतोष नागरगोजे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांच्या नावाचा वापर करून पैशांची मागणीही करण्यात आली होती. (Nashik Cyber Crime Fake Facebook Profile of Municipal Corporation Officer) नोकरीचे आमिष, ऑनलाइन खरेदी, केवायसी पडताळणी, एटीएम कार्ड बंद पडणार असल्याची थाप मारत कार्डवरील माहिती विचारून गंडा घालण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नागरिकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे, कोणताही ओटीपी क्रमांक त्यांना शेअर करू नये, स्वतःच्या खात्याच्या कसलिही माहिती फोनवरून कुणालाही देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (In Nashik-Wani, a person was arrested for cheating using the names of Deputy Speaker of the Assembly and MLAs)

संबंधित बातम्याः

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादी खडसेंच्यापाठी खंबीर: जयंत पाटील

नाशकात एक बिबट्या जेरबंद, एक मोकाट!

VIDEO : फॉर्मल्सवर वायूवेगाने दोरीउड्या, फिटनेस फ्रीक गिरीशभाऊ कार्यकर्त्याच्या जीममध्ये

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI