ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादी खडसेंच्यापाठी खंबीर: जयंत पाटील

ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे हे सर्व जगजाहीर आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे. (ED being used to target ruling MVA leaders in Maharashtra says jayant patil)

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादी खडसेंच्यापाठी खंबीर: जयंत पाटील
jayant patil

चाळीसगाव: ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे हे सर्व जगजाहीर आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. (ED being used to target ruling MVA leaders in Maharashtra says jayant patil)

चाळीसगावमधील नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ED, CBI या केंद्राच्या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

वेगळ्या चर्चेची गरज नाही

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची भूमिका हीच की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे. आमची बैठक झाली आहे. त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 12 सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत असं सर्वाना वाटतंय, असंही त्यांनी सांगितलं.

औरंगाबादलाही जाणार

जयंत पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून आज चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची ते पाहणी करत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी मराठवाडा आणि खानदेशात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी दरड कोसळली होती तर बर्‍याच गावांमध्ये पूराचे पाणी घुसुन घरांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत. (ED being used to target ruling MVA leaders in Maharashtra says jayant patil)

 

संबंधित बातम्या:

बारामतीच्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; पीकविम्याचा 25 टक्के अ‍ॅडव्हान्स मिळणार

मोठी बातमी: चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची पुण्यातील 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न

Mumbai Rains Maharashtra Weather : मुंबईत पहाटेपासून रिमझिम, राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज

(ED being used to target ruling MVA leaders in Maharashtra says jayant patil)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI